परळी वैजनाथ (प्रतिनिधी) खा.सुप्रियाताई सुळे शुक्रवार दि.27 मे रोजी परळी शहरात आल्या असता त्यांचे अ.भा.वारकरी मंडळाचे राज्य उपाध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या वतीने लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब चौक येथे टाळ, मृदंगाच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आले.
खा.सुप्रियाताई सुळे यांचे परळी नगरीत येताच टाळ मृदंगाच्या गजरात अ.भा.वारकरी मंडळाच्या वतीने कोकाटे महाराज व गोविंद महाराज यांच्या भव्य स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या संसदरत्न खा.सुप्रियाताई सुळे यांचे अ.भा.वारकरी मंडळाच्या वतीने करण्यात आले.परभणी जिल्ह्यात विविध कार्यक्रमासाठी आल्या असून त्या सोनपेठ वरून परळी मार्गे आज सायंकाळी लातूरला जाणार असल्याचे कळताच वारकरी मंडळाच्या वतीने शाल श्रीफळ फेटा व श्री विठ्ठलाची मुर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आला.
परळी शहरात स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब चौकात खा.सुप्रियाताई सुळे यांचे स्वागत सत्कार करण्यासाठी उपस्थित ह.भ.प गोविंद महाराज नंदनंजकर,ज्ञानेश्वर महाराज कतारे यांच्यासह कन्हैया वारकरी संस्थेतील विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते
No comments:
Post a Comment