परळी वैजनाथ ( प्रतिनिधी) लाखो परळीकरांचा कारभार पाहणाऱ्या परळी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना भेटायचे म्हटल्यावर आता आठवड्यातून दोन दिवसांत दोनच तासात भेटता येणार आहे. तशा प्रकारचा अजब फतवा मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर लावण्यात आला आहे.
नुकतेच एक महिन्यापूर्वी मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांची बदली झाली. आणि त्यांच्या जागी सुंदरलाल बोंदर यांची नियुक्ती झाली. ते परळीत आल्यानंतर काही पक्ष, संघटना, पञकार, शहरातील सामाजिक कार्यकर्ते, नागरिक यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांना शुभेच्छा दिल्या.
पण पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर थोडे दिवस झाले नाहीत तोच ज्या परळीच्या नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. त्याच परळीकरांना भेटणे मुख्याधिकारी बोंदर यांनी भेटणे अवघड केले आहे. परळीची लोकसंख्या सुमारे दोन लाखाच्या घरात आहे. शहरातील नागरिकांचे अनेक प्रश्न असतात. तक्रारी असतात. यासाठी मुख्याधिकारी यांना भेटणे आणि त्यांच्या समोर आपले समस्या मांडावी ज्यामुळे आपणाला न्याय मिळेल असे वाटते.
शहरातील अनेक विषयावर विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी जनतेच्या प्रश्नावर थेट मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करीत असतात. जनतेशी संबंधीत असे हे महत्वाचे पद आहे. त्यामुळे नागरिकांना मुख्याधिकारी यांना कधीही भेटता आले पाहिजे. लावलेल्या सूचनेनुसार जर विचार केला तर एकतर आता राज्य शासनाने पाच दिवसाचा आठवडा केला आहे. त्यात पुन्हा दुसरा आणि चौथा शनिवार सुट्टी. मग लोकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे काम घेऊन जायचे केंव्हा.
दालनाबाहेर लावलेल्या नोटीसीनुसार आठवड्यातून सोमवार व मंगळवार या दोन दिवसात सायंकाळी 4 ते 6 अशी दोन तासांची अभयंगतांना भेटण्याची वेळ ठेवलेली आहे. त्यासाठीही बाहेर शिपायाजवळ चिठ्या ठेवल्या आहेत. ती चिठ्ठी द्यायची मग नंबर यायचा. बरे हा नियम केवळ सर्वसामान्य नागरिक यांच्याठीच आहे की नगरसेवक, गुत्तेदार आणि राजकीय नेत्यांसाठी वेगळा हे माञ गुलदस्त्यात आहे. मात्र न.प.मधील असंख्य झालेल्या भ्रष्टाचाराला उत्तर देण्यात सामोरे न जाण्याच्या निर्णय त्यांच्याच नसावा म्हणुन असा अजब फतवा मुख्याधिकारी यांनी स्वता काढला का,त्यांना पडद्यामागील सुत्रधाराने काढायला लावला अशी चर्चा परळीतील नागरीकात होत असुन परळी न.प. स्थापन झाल्या पासुन आज तागायत अशा प्रकारचा बोर्ड अथवा सूचना माञ परळीकरांनी कधी पाहिला नव्हता.
No comments:
Post a Comment