मागील काही दिवसांपासुन संभाजीराजे छत्रपती हे राजकीय चर्चेत आहेत. राज्यसभा जागांवर होणाऱ्या निवडणुकांवरून सध्या रणधुमाळी सुरु असताना त्यांना उमेदवारी देण्याच्या घटनाक्रमांमुळे सध्या ते जास्त चर्चेत आले.
संभाजीराजे यांनी शिवसेना पुरस्कृत उमेदवारी नाकारली. त्यांना अपक्ष उभे राहायचे होते.
परंतु शिवसेनेनं शिवबंधन न बांधता पाठिंबा देण्यास नकार दिला. दरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेत राज्यसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. परंतु यंत्र मात्र राज्यभरातून विविध प्रतिक्रिया आल्या आहेत.
आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनीही प्रतिक्रीया दिली. संभाजीराजे यांचा गेम झाला असल्याची प्रतिक्रीया शिवेंद्रराजे यांनी दिली.
आमदार शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, संभाजीराजेंना राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याआधीच माघार घ्यावी लागली. मला तर वाटत आहे त्यांचा गेम झाला. त्यांचा गेम कोणी केला, हे संभाजीराजेंना चांगलेच माहित आहे.
संभाजीराजेंच्या पाठिमागे महाराष्ट्रातील मराठा समाज उभा आहे. त्यांच्या गडकिल्ले संवर्धनाचे काम, मराठा आरक्षण लढाईत त्यांचे योगदान आहे.
छत्रपती घराण्यातील वंशजाचा महाविकास आघाडीने सन्मान राखायला हवा होता, असंही शिवेंद्रराजे म्हणाले.
No comments:
Post a Comment