Wednesday, May 18, 2022

परळी शहरात महात्मा गौतम बुध्द जयंती निमित्त परळी शहरात भव्य धम्म रॅली संपन्न .


परळी वैजनाथ (प्रतिनीधी) : बुध्द जयंतीनिमित्त परळीत दि.15 मे 2022 रोजी बुध्द वंदना संघाच्या वतीने शहरातुन भव्य धम्म रॅली सांय 6:00वा मोठ्या उत्साने काढण्यात आली.

        बुध्द वंदना संघाच्या वतीने वैशाख पौर्णिमा अर्थात बुध्द जयंती 15मे रोजी विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात आली.सकाळी 9:00 वाजता डाॅ बाबासाहेब आंबेडकर सभागृह,भिमनगर,परळी धम्मध्वजाचे ध्वजारोहन मा एच टी वाघमारे यांच्या हस्ते झाले ,त्यानंतर सामुदायिक "बुध्दवंदना"होऊन अंबादास रोडे व उत्तम समुद्रे यांच्याकडुन "खिरदान" करण्यात आले.सांय. 6:00वाजता भिमनगर येथुन सजवलेल्या रथातुन तथागत भगवान गौतम बुध्द यांच्या भव्य अशा प्रतिमेची मिरवणुक अर्थात धम्म रॅली सुरुवात झाली.या रॅलीत "जग में बुध्द का नाम है! यही भारत की शान है!,"जगाला युध्द नको! बुध्द हवा"',बुध्दम शरणम गच्छामी"अशा घोषणा देत ही रॅली गणेशपार,मिलिंद काॅलेज,टाॅवर चौक,मोंढा मार्केट मार्गे डाॅ बाबासाहेब आंबेडकर पुतळा,रेल्वे स्टेशन,परळी येथे विसर्जन करण्यात आले.सम्राट अशोक विचार मंचच्या वतीने रॅलीचे भव्य स्वागत केले व रॅलीतील सर्वांना खिरदान करण्यात आले.

या रॅलीमध्ये परळी शहरातील विविध नगर व वस्त्यातून असंख्य बौध्दजन शुभ्र वस्त्र परीधान करुन शिस्तीत सहभागी झाले होते.

    सदरील रॅली यशस्वी करण्यासाठी प्रा विलास रोडे,सिध्दार्थ जगतकर,वैजनाथ(तात्या)जगतकर,भालचंद्र ताटे,भारत ताटे,वसंत बनसोडे,संदीप ताटे,अशोक तरकसे राधाकिशन शिंदे,अॅड संजय रोडे,अनिता रोडे,वंदना जगतकर,सपना रोडे,गवळणबाई गोखले,रोहीनी कांबळे,सोजरबाई ताटे डाॅ समिक्षा रोडे,सुजाता रौडे इ सह अनेक जणानी परिश्रम घेतले


No comments:

Post a Comment