Tuesday, May 24, 2022

दैनिक लोकांकित वृत्तपत्राचा वर्धापन दिन पनवेल मध्ये होणार साजरा ! विविध माध्यमातील मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार.

बीड (प्रतिनिधी) दैनिक लोकांकित वृत्तपत्राचा सहावा वर्धापन दिन पनवेल मध्ये होणार असून वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून वृत्तपत्राबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून नाट्य कलाकार, सामाजिक कार्यकर्ते यांना समाजभूषण आणि विविध माध्यमांतील पत्रकार यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात लोकनिर्माण या वृत्तपत्राचे संपादक आणि एजेएफसी या राष्ट्रीय पत्रकार संघटनेचे केंद्रीय सचिव बाळकृष्ण कासार यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे तसेच बीड जिल्हयातील गोरगरिबांना सतत मदत करणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ.बाबु जोगदंड साहेब यांच्या सामाजिक कार्याची पावती म्हणून त्याना समाजरत्न पुरस्काराने गोरविण्यात येणार आहे. 
     या कार्यक्रमाला पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, अलिबाग विधानसभेचे आमदार महेंद्र दळवी, बाळासाहेब पाटील ( महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी अध्यक्ष, भाजप), संदीप भैया क्षिरसागर - आमदार बीड विधानसभा सभा मतदार संघ , जयवंत सुतार, महापौर नवी मुंबई मनपा,  जे एम म्हात्रे मा. नगराध्यक्ष, पनवेल, जेष्ठ समाजसेवक नानजीभाई ठक्कर ठाणावाला, सामाजिक कार्यकर्ते तथा दैनिक लोकांकितचे बीड जिल्हा प्रतिनिधी विवेक कुचेकर  यांच्यासह  विविध क्षेत्रातील सिने, नाट्य कलावंत उपस्थित राहणार असून यावेळी मनोरंजनासाठी लावण्यांचा कार्यक्रम  होणार आहे. हा कार्यक्रम रविवार दिनांक २९/५/२०२२ रोजी सायंकाळी सहा वाजता   पनवेल येथे होणार असून निमंत्रित करण्यात आलेले पुरस्कार करते आणि मान्यवर यांनी उपस्थित राहावे असे संपादक संजय पवार यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment