Monday, May 23, 2022

बिंदुसरा नदीपात्र मान्सूनपूर्व स्वच्छता व अतिक्रमित बांधकाम प्रकरणात दोषींवर कारवाईस असमर्थ नगर परिषदेला श्रध्दांजली व शोकसभा - डाॅ.गणेश ढवळे

_____
बीड नगरपरिषद बीड शहरातील नदी, नाले, ओढे यांच्यावरील अतिक्रमित बांधकाम प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यास तसेच बिंदुसरा नदीपात्र मान्सूनपूर्व स्वच्छ करण्यास असमर्थ मृतप्राय नगरपरिषद प्रशासनाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखालील आज दि.२३ मे  सोमवार रोजी  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निष्क्रिय मृतप्राय नगरपरिषद प्रशासनाला श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते, शोकसभेला व श्रद्धांजली वाहण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड,माजी सैनिक अशोक येडे ,जिल्हाध्यक्ष आप  बीड,भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर, बलभीम उबाळे,उपाध्यक्ष मराठवाडा,ऑल इंडिया पॅथर सेना नितिन  सोनावणे,सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद मोईज्जोदीन, सय्यद आबेद,शेख मुबीन बीडकर ,सरफराज खान,ज्ञानेश्वर शिंदे, अशोक तावरे आदि उपस्थित आहेत. 

सविस्तर माहीतीस्तव:-
___
बीड शहरातील बिंदुसरा, करपरा तसेच मौजे. आनंदवाडी येथील सर्व्हे नंबर २०२ सरवळा नामक ओढा तसेच करपरा नदीला लागुन भक्ति कन्स्ट्रक्शन नगरच्या पाठीमागील बाजुस तसेच बिंदुसरा नदीपात्रात सारडा कॅपिटलच्या पाठीमागील बाजुस अनाधिकृत बांधकाम करण्यात येत असून संबधित प्रकरणात दोषींवर गुन्हे दाखल करण्यात नगरपरिषद प्रशासन असमर्थ असून मुख्याधिकारी नगरपरिषद बीड, नगररचनाकार, भुमिअभिलेख, जलसंपदा विभागातील आधिका-यांसह भुमाफियांनी संगनमतानेच जागा हडप केल्या असून संबधित प्रकरणात पुराव्यासह तक्रारी,आंदोलनानंतर सुद्धा जाणीवपूर्वक कारवाईस टाळाटाळ केली जात आहे.


मान्सूनपूर्व स्वच्छतेचा निधी घशात ; दुषित पाणी नागरीकांच्या घरात ; नागरीकांचे रोगराई पासुन रक्षण करा:-डाॅ.गणेश ढवळे 
___
 मान्सूनपूर्व स्वच्छतेसाठीचा निधी राजकीय नेत्यांच्या घशात आणि बिंदुसरा नदीपात्रातील तसेच ओढ्यातील पाणी नागरीकांच्या घरात अशी अवस्था दरवर्षीप्रमाणेच झाली असून पावसाळ्यात नदीचे पाणी वस्त्यामध्ये शिरत असून रोगराई पसरण्याचा धोका असून तो टाळण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने मान्सूनपूर्व स्वच्छतेची कामांना प्राधान्य देऊन नदीपात्रातील कचरा, झाडे, झुडपे काढुन टाकावीत,तसेच पर्यावरणाचा -हास करत पर्यावरण प्रदुषित केल्याबद्दल संबधित दोषींवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना मागणी केली आहे. 

   घनकचरा व्यवस्थापनाचे वर्षाकाठी साडेतीन कोटी पाण्यात;कंत्राटदार कनक एन्ट्रप्रायजेसवर कारवाई करा 
___
बीड शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचे कंत्राट अमरावतीच्या कनक एन्ट्रप्रायजेस कंपनीला देण्यात आले असुन महिन्याकाठी २७ लाख रूपये म्हणजेच वर्षाकाठी साडेतीन कोटी रूपये दिले जातात.मात्र नियमित घंटा गाडी, कचरा उचलणे, गल्लोगल्ली कचरा संकलन करणे आदि. कोणतीही कामे न करताच कचरा बिंदुसरा नदीपात्रात टाकुन पाणी दुषित करून रोगराई पसरवण्यास कारणीभूत ठरत आहेत.कंत्राटदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. 

 भविष्यात पुरामुळे जिवितहानी झाल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा 
____
१९८९ साली बीड शहरातुन जाणा-या बिंदुसरा नदीचे पाणी शहरातील अनेक वस्तीमध्ये घुसुन मोठ्याप्रमाणात आर्थिक व जिवितहानी झाली होती भविष्यात तशी दुर्घटना घडल्यास संबधित जबाबदार नगरपरिषद बीड, नगररचनाकार, भुमिअभिलेख, जलसंपदा विभागातील आधिका-यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हे दाखल करण्यात यावेत.

No comments:

Post a Comment