Tuesday, May 17, 2022

डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्याची उंची वाढवणे व सुशोभीकरण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार ;- आ.संदिप क्षीरसागर

बीड (प्रतिनीधी) : शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढवून व येथील परिसराचे सुशोभीकरण करणे हे काम आपल्या सर्वांच्या अस्मितेचे असून ते पुर्ण होईपर्यंत सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे आ.संदीप क्षीरसागर यांनी सोमवारी दि.16 मे रोजी तथागत गौतम बुद्ध यांना अभिवादन करतांना सांगितले.
दया, क्षमा, शांती, त्याग, सेवा, समर्पणाचा संदेश देवून आदर्श जीवनाचा मार्ग दाखवणारे तथागत गौतम बुद्ध यांना आ.संदीप क्षीरसागर यांनी बुद्ध पौर्णिमेनिमित्त अभिवादन केले. यावेळी बौद्ध धर्माचे पुरस्कर्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढवणे व सुशोभीकरण करणे या बाबत काही दिवसांपूर्वी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत सकारात्मक बैठक झाली होती. या बैठकीतील मुद्यांच्या अनुपालनासंदर्भात नगर परिषदेचे प्रशासक तथा उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर यांच्याकडे आ.संदीप क्षीरसागर यांनी बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने तात्काळ बैठक घेतली.
  व या कामास गती प्राप्त व्हावी यासाठी नियोजन करत संबंधितांना योग्य ते निर्देश दिले. अभिवादन सभेमध्ये, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढवून पुतळा सुशोभीत करत आपण आपल्या शहराची अस्मिता उंचवणार आहोत असे सांगितले. दरम्यान या कामाच्या अनुषंगाने उपस्थित महिला भगिनी व उपस्थित बांधवांशी अपेक्षित असलेल्या बाबींविषयी आ.संदीप क्षीरसागर यांनी चर्चा केली. या कामास प्रत्यक्षात लवकरच सुरूवात होणार असल्याचे त्यांनी कळविले आहे. 


No comments:

Post a Comment