Tuesday, May 17, 2022

लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिपच्या वतिने आयोजित क्रिकेट स्पर्धेत छत्रपती क्रिकेट क्लब सारोळा गावचा दणदणीत विजय .


रेणापूर (प्रतिनीधी) आज दिनांक 17/05/2022 रोजी, लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप ग्रामीण T10. ही स्पर्धा पार पडली, आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिलीच मॅच रेणापूर येथे झाली आहे. या स्पर्धे मध्ये विलासराव देशमुख साहेब क्रिकेट क्लब ईटी आणि छत्रपती क्रिकेट क्लब सारोळा हे दोन संघ आमने सामने एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते, या दोन्ही संघांनी खूप चांगल्या पद्धतीने सामना खेळत प्रेक्षकांना  विजयाची आशा लावत ती आशा जीवित ठेऊन एक आशेचा किरण म्हणून एकमेकांना तट देत सामना खेळला...                    यानंतर विलासराव देशमुख साहेब क्रिकेट क्लब ईटी संघाने पहिली बॅटिंग करून 77 रन काडत, छत्रपती क्रिकेट क्लब सारोळा या संघाला 77 रणाच आव्हान चेस करण्यासाठी दिलं होत, त्याच पद्धतीनं आव्हानाला सामोरे जात रन चेस करण्यासाठी या संघातील खेळाडूंनी ते आव्हान पेलत खरोखरच उत्कृष्ट फलंदाजी करत छत्रपती क्रिकेट क्लब सारोळा संघाला  खेळाडूंनी विजेतेपद मिळऊन दिले आहे. आणि पहिल्याच मॅच मध्ये पराभव करत दणदणीत विजय मिळवला.

छत्रपती क्रिकेट क्लब चा खरा खुरा फलंदाज महेश जाधव यांनी अधिक धावा काढून संघाला विजयी करून तो सामना वीर ठरला आहे...                      छत्रपती क्रिकेट क्लब सारोळा संघाचे कर्णधार शरद जाधव यांनी कर्णधार पदाची धुरा आपल्या हातात घेऊन एक चांगला कर्णधार यांच्या रुपात या छत्रपती क्रिकेट क्लब सारोळा संघाला मिळाल्या मूळ पहिलाच सामना जिंकून संघाला विजेतेपद मिळऊन दिलं.                                  या संघामध्ये इरफान शेख, सुमित गुरुफळे, इम्रान शेख, कॅप्टन शरद जाधव, सामना विर महेश जाधव,  अनिकेत जाधव, अल्ताफ शेख, नवनाथ जाधव, रीशब शेख, अबू बकर शेख, यांनी परिश्रम घेऊन छत्रपती क्रिकेट क्लब संघाला विजेते पद मिळउन दिले आहे, आणि या खेळाडूंच सर्वत्र  कौतुक होत आहे....

No comments:

Post a Comment