*25 जुन ते 25 जुलै दरम्यान डॉ.विरूपाक्ष शिवाचार्य व शांतेश्वर शिवाचार्य यांचे आषाढमास तपोनुष्ठान सोहळा.
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) तीर्थक्षेत्र परळी वैजनाथ येथे 23 व 24 जुलै रोजी जगदगुरू डॉ.वीरसोमेश्वर राजदेशिकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांची अड्डपालखी सोहळा, धर्मसभा तसेच 25 जुन ते 25 जुलै दरम्यान डॉ.विरूपाक्ष शिवाचार्य व शांतेश्वर शिवाचार्य यांचे आषाढमास तपोनुष्ठान सोहळयाचे वीरशैव लिंगायत समाज परळीच्या वतीने करण्यात आले आहे.
येथील संतश्री गुरूलिंग स्वामी मठ संस्था (बेलवाडी) व वके्रश्वर मंदिर परळी येथे श्रीमद रंभापुरी महापिठ बाळेहोन्नुरू कर्नाटक येथील वीरसिंहानाधिश्वर श्री श्री श्री 1008 जगदगुरू प्रसन्नरेणुक डॉ.वीरसोमेश्वर राजदेशिकेंद्र शिवाचार्य भगवतपाद महास्वामीजी यांचा अड्डपालखी सोहळा, धर्मसभा, महापूजा, अनुष्ठान, मंगल पूजन व मार्गदर्शन कार्यक्रमाचे परळी येथे आयोजन करण्यात आले असून याचसोबत श्रीक्षेत्र मन्मथधाम संस्था, कपिलधार, मांजसुंबा येथील ष.ब्र.108 श्री सदगुरू डॉ.विरूपाक्ष शिवाचार्य स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली व नेगळुरू जि.हावेरी कर्नाटक हिरमेठ संस्थान येथील श्री. ष.ब्र.108 गुरू शांतेश्वर शिवाचार्य स्वामीजी यांचे मार्गदर्शनाखाली दि.25 जुन 2022 ते 25 जुलै 2022 रोजी पर्यंत महिनाभर आषाढमास तपोनुष्ठान सोहळा होणार असून या अंतर्गत दररोज सकाळी 5 ते 7 वा. रूद्राभिषेक, सकाळी 7 ते 11 वा. ग्रंथवाचन, सकाळी 11 ते 1 द्वितीय पुजा, दुपारी 4 ते 5.30 वा. शिवपाठ, पाऊल, भजन, सायंकाळी 5.30 ते 6 वा. प्रवचन, सायं.6 ते 7 वा. स्वाामीजींचे दर्शन, सायं.7 वा. आरती व प्रसाद असे कार्यक्रम होणार असून दि.23 जुलै 2022 रोजी रंभापुरी जगदगुरू महापिठ बाळेहोन्नुरू कर्नाटक येथील वीरसिंहानाधिश्वर श्री श्री श्री 1008 जगदगुरू प्रसन्नरेणुक डॉ.वीरसोमेश्वर राजदेशिकेंद्र शिवाचार्य भगवतपाद महास्वामीजी यांचा अड्डपालखी सोहळा, धर्मसभा कार्यक्रमाचे परळी येथे आयोजन करण्यात आले आहे. दि.24 जुलै 2022 रोजी महापूजा व धर्मसभा व वधु वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तसेच दि.25 जुलै 2022 रोजी अनुष्ठान व धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
परळीत होणार्या अड्डपालखी सोहळयाचे रंभापुरीचे जगदगुरू डॉ. विरसोमेश्वर यांना निमंत्रण
परमपूज्य जगद्गुरु श्रीक्षेत्र रंभापुरी महास्वामीजी यांना प्रभू वैद्यनाथाच्या पुण्यभूमी श्री क्षेत्र परळी वैजनाथ नगरीमध्ये प्रथमच विविध धार्मिक कार्यक्रमासाठी येण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. परळी वैजनाथ येथील समस्त वीरशैव लिंगायत बांधवांतर्फे प्रातिनिधिक स्वरूपात श्री नारायण देव गोपणपाळे,अॅड. शशिकांत धनराज अप्पा नरवणे शशांक सूर्यकांतआप्पा निर्मळे , अॅड.नरहरी आप्पा टेकाळे यांनी शनिवार दिनांक 28 मे 2022 रोजी कर्नाटक येथील जमखंडी जिल्हा बागलकोट येथे श्रीमद् रंभापुरी वीर सिंहासनाधीश्वर श्री श्री श्री 1008 जगद्गुरु प्रसन्न रेणुक डॉ. वीर सोमेश्वर शिवाचार्य भगवतपाद महास्वामीजी श्रीमद् रंभापुरी महापीठ, बाळे हुन्नूर, कर्नाटक यांच्या चरणी श्रीक्षेत्र परळी वैजनाथ येथे होणार्या ष ब्र 108 श्री सद्गुरु डॉ विरुपाक्ष शिवाचार्य स्वामीजी श्री क्षेत्र मनथधाम यांच्या मार्गदर्शनाखाली होणार्या श्री ष ब्र 108 श्री गुरूशांतेश्वर स्वामीजी, हिरेमठ संस्थान, नेगळूरू, जिल्हा हावेरी, कर्नाटक यांच्या आषाढ मास तपो अनुष्ठान कार्यक्रम दिनांक 25 जून ते दिनांक 25 जुलै 2022 च्या समाप्ति निमित्त आयोजित विविध धार्मिक सोहळ्यासाठी आगमन व्हावे असे विधीवत आमंत्रण सादर केले.
त्यास वीरशैव लिंगायत समाजाचे आद्यपीठ असलेल्या श्रीक्षेत्र रंभापुरी येथील परमपूज्य जगद्गुरुंनी संमती देऊन कार्यक्रम यशस्वीतेसाठी शुभ आशीर्वाद दिले .त्यावेळी ष ब्र 108श्री गुरूशांतेश्वर स्वामीजी यांची विशेष उपस्थिती होती. वीरशैव लिंगायत समाजाचे इतर चारही जगद्गुरु परळी वैजनाथ नगरीत यापूर्वी आलेले आहेत. वीरशैव लिंगायत समाजाचे आद्यपीठ असलेले श्री क्षेत्र रंभापुरी जगद्गुरु यांचे प्रथमच परळीवैजनाथ नगरीमध्ये आगमन व अन्य धार्मिक सोहळ्याची व दर्शनाची संधी प्राप्त झाल्यामुळे समस्त वीरशैव लिंगायत समाजामध्ये आनंदाची लहर निर्माण झाली आहे.
या धार्मीक कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन वीरशैव लिंगायत समाज परळी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment