गेवराई;- (प्रतिनीधी ) पवळाचीवाडी येथे एका ट्रकमध्ये खत आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी यांना झाल्यानंतर सदरील अधिकार्याने ही गाडी ताब्यात घेवून चकलांबा पोलिसाकडे स्वाधीन केली. या गाडीमध्ये जे खत आहे ते अनाधिकृत असल्याचे सांगण्यात येते. या खताला विक्री करण्यास परवानगी असणे गरजेचे असतानाही संबंधीतांनी परवानगी काढली नसल्याचे समोर आले. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
गेवराईचे तालुका कृषी अधिकारी तथा खत निरीक्षक संजयकुमार ढाकणे यांना पवळाचीवाडी याठिकाणी एम.एच.12 एचबी 2494 या गाडीमध्ये खत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी घटनास्थळी जावून खताची पाहणी केली. या गाडीत 50 किलोच्या 240 बॅगा आढळून आल्या. सदरील या खतास विक्रीस परवाना असणे आवश्यक आहे. सदरील उत्पादक विनापरवाना खताची विक्री करत असल्याचे दिसून आल्यानंतर यावर कारवाई करण्यात आली. याप्रकरणी मेहलकुमार भगवानजीभाई गिनोए वय 31 याच्याविरूध्द फिर्याद देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment