Saturday, July 18, 2020

चार चाकी वाहानाने गांजा घेऊन जाणार्‍या दोन आरोपींना पाच वर्षांची शिक्षा.नाका बंदीत केली होती कारवाई.

* 48 गांजाचे पाकिट गाडीत आढळले होते.

बीड (प्रतिनीधी )- शिरूर तालुक्यातील गोमळवाडा चौकात नाकाबंदीच्या दरम्यान एका चारचाकी गाडीची झाडाझडती घेण्यात आली होती. या गाडीत गांज्याचे 48 पाकिटे आढळून आले होते. या प्रकरणी दोषींविरोधात गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र बीडच्या प्रथम सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी ठरवून दोघांनाही प्रत्येकी पाच वर्षांची शिक्षा व पंचवीस हजार रुपये दंड ठोठावला.
दि. 25-7-2017 रोजी पहाटे अडीच वाजता बीडहून पाथर्डीकडे भरधाव वेगात निघालेली चारचाकी गाडी एम.एच. 17 ए.झेड. 6811 ही शिरूर तालुक्यातील गोमळवाडा चौकात असलेल्या नाकाबंदीवर असलेले एपीआय दराडे यांच्यासह त्यांच्या कर्मचार्‍यांनी अडवली असता त्या गाडीची झाडाझडती घेण्यात आली. त्यामध्ये 48 पाकिटे गांज्याचे आढळून आले होते. या प्रकरणी आरोपी शेख मुबारक दगडु (रा. मढी ता. पाथर्डी), दिनकर त्रिंबक तुपे (रा. बर्‍हाणपुर ता. नेवासा) आणि ज्याला विकण्यात येणार होता तो राजेंद्र बाबूराव टेकळे (रा. नाशिक) या तिघांविरोधात शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास एपीआय दराडे यांनी करून हे प्रकरण बीड येथील प्रथम सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. यात फिर्यादी, पंच, नायब तहसीलदार, कॉन्स्टेबल यांच्यासह आदींच्या साक्ष नोंदवण्यात आल्या. प्रथम सत्र न्यायाधीश कचरे यांनी आरोपी शेख मुबारक व त्रिंबक तुपे या दोघांना दोषी ठरवून कलम 20/ब नुसार पाच वर्षांची शिक्षा व 25 हजार रुपये दंड ठोठावला. यातील तिसरा आरोपी राजेंद्र टेकडे हा निर्दोष मुक्त झाला. या प्रकरणी सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. मिलिंद वाघीरकर यांनी काम पाहिले.

गांज्याचे पाकिटे 48
सॅम्पल मात्र एकाचेच पाठवले आरोपींना शिक्षा झाली कमी कारवाईमध्ये गांज्याचे 48 पाकिटे जप्त करण्यात आले होते. मात्र एकच पाकिट सॅम्पल म्हणून तपासणीसाठी पाठविण्यात आले. इतर पाकिटातले सॅम्पल पाठविण्यात आले नाही. न्यायालयापुढे एकच सॅम्पल समोर आले त्यामुळे आरोपींना कमीत कमी शिक्षा झाली. इतर पाकिटांचे सॅम्पल तपासणीसाठी पाठविण्यात आले असते तर नक्कीच आरोपींना जास्त शिक्षा झाली असती.

No comments:

Post a Comment