बीड (प्रतिनीधी )-जिल्ह्यात कोरोना झपाटयाने वाढत असताना आता कोरोनाने पोलिस ठाण्यातही शिरकाव केला आहे. बीड शहर पोलिसांनी गेल्या पंधरा दिवसांपूर्वी दहिफळ येथील कलम ३०२ मधील गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेत शहर पोलिस ठाण्यातील लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. त्या आरोपीसह एक पीएसआय आज पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून डोळ्यात तेल घालून पहारा देणार्या पोलिसांनाच आता कोरोनाची लागण होऊ लागली आहे. केज तालुक्यातील दहिफळ येथे गेल्या नऊ महिन्यांपूर्वी ३०२ चा गुन्हा दाखल झाला होता. त्यामधील फरार आरोपी बीड शहर पोलिसांनी ताब्यात घेत या गुन्ह्याचा तपास लावला होता. गेल्या तीन दिवसांपूर्वी या आरोपींसह ठाण्यातील पीएसआयसह अन्य कर्मचार्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. रात्री आलेल्या अहवालामध्ये एका पीएसआयसह दोन आरोपी पॉझिटिव्ह निघाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या पॉझिटिव्ह पीएसआयसह आरोपीच्या संपर्कात शहर पोलिस ठाण्याचे एपीआय गजानन जाधव यांच्यासह ३२ कर्मचारी आले आहेत. या सर्व कर्मचार्यांचे स्वॅब आज घेतले जाणार आहेत. तर दरोड्याच्या तयारीत असलेला आरोपीही पॉझिटिव्ह निघल्याने त्याच्या संपर्कात आलेले स्थानिक गुन्हा शाखा, बीड ग्रामीण पोलिसांचे स्वॅब काल घेण्यात आले होते त्याचा रिपोर्ट आज येण्याची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment