* कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करा,एकही शेतकरी वंचित राहता कामा नये.
* शेतकऱ्यांशी गैरवर्तवणूक खपवून घेतली जाणार नाही,खा.प्रितमताईंची बँक अधिकाऱ्यांना तंबी.
बीड;- (प्रतिनीधी ) विमा कंपनी नियुक्तीचा प्रश्न मार्गी लावल्या नंतर खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी कर्ज वाटपाच्या विषयात लक्ष घातले असून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यालाच आपले प्राधान्य असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.काल दि.१५ जुलै रोजी खा.प्रितमताई मुंडे यांनी जिल्ह्यातील बँक अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.यावेळी त्यांनी शेतकऱ्यांकडून होणाऱ्या तक्रारींचा जाब बँकअधिकाऱ्यांना विचारला व एकही शेतकरी कर्ज वाटपापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना केल्या.बैठकी दरम्यान खा.प्रितमताईंनी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट व वाटप करण्यात आलेल्या कर्जाचा आढावा घेतला.
खरीप हंगामाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील शेतकरी सध्या नवीन पीक कर्ज मिळवण्या साठी प्रयत्न करत आहेत.परंतु जाचक नियम व कर्जमाफीच्या गोंधळामुळे बँकांकडून कर्ज वाटपात दिरंगाई होतेआहे.खा.प्रितमताई मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या या तक्रारींची दखल घेऊन बँकांच्या अधिकाऱ्यांची व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली व कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करून सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्याच्या सूचना केल्या.तसेच महात्मा फुले योजना व छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना नवीन कर्ज देण्याचे निर्देश देताना बेबाकी प्रमाणपत्रासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करू नका अशा सूचना देखील त्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना केल्या.
बैठकी दरम्यान खा.मुंडे यांनी कर्ज वाटपाच्या उद्दीष्ठाचा आढावा घेऊन मंजूर झालेल्या कर्ज प्रकरणांसह थकीत कर्ज प्रकरणांची माहिती घेतली व थकीत कर्ज प्रकरणे निकाली काढून उद्दीष्ठ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.कर्ज मिळवण्यासाठी बँकेत येणाऱ्या शेतकऱ्यांना कर्मचाऱ्यांकडून अपमानजनक वागणूक मिळत असल्याच्या तक्रारी बाबत बोलताना खा.प्रितमताईंनी “जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला सन्मानपूर्वक वागणूक मिळाली पाहिजे,शेतकरी,सर्वसामान्यांशी गैरवर्तवणूक खपवून घेतली जाणार नाही” अशी तंबी देखील दिली.
व्हिडियोकॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या या आढावा बैठकीमध्ये खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी आढावा घेतल्या नंतर बँक कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले व परळी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोरोना बाधित कर्मचाऱ्यांप्रती दुःख व्यक्त करून त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी सदभावना व्यक्त केल्या.
No comments:
Post a Comment