Thursday, July 16, 2020

विकासाच्या नावाखाली नगर पंचायतने शहराचेवाटोळे केले,छोटे छोटे व्यावसायिक उद्ध्वस्त झाले;-आ.बाळासाहेब आजबे

आष्टी (प्रतिनीधी ) गेल्या सहा महान्यापासून शहरातील सगळेच रस्ते नगर पंचायतने खोदून ठेवले असून,एकही रस्ता पुर्ण केला नाही.तसेच छोटे छोटे व्यावसायिकांचे दुकाने त्यांना कसल्याच नोटीस न देता पाडून टाकले,याउपरही पुन्हा शहरातील ऐतिहासिक वास्तू असलेली कमानवेस पाडायचे कारस्थान नगर पंचायत करत असून,हे सर्व काम कुणाच्या सांगण्यावरून होत आहे हे सर्व जनतेला माहित आहे.विकास कामे करा व जाणून-बुजून नुकसान करू नका असा घणाघात आ.बाळासाहेब आजबे यांनी पञकार परिषदेत केला आहे.
आष्टी येथील किशोर नाना हंबर्डे यांच्या निवासस्थानी गुरूवार दि.१६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या पञकार परिषदेत आ.बाळासाहेब आजबे बोलत होते.पुढे बोलतांना ते म्हणाले,गेल्या सहा सात महिन्यापासून शहरात विकासाच्या नावाखाली छोटे छोटे अतिक्रमण पाडले गेल्या सहा महिन्यापासून नगर पंचायतने एकही रस्ता पुर्ण केला नाही तर उलट जुन महिन्याच्या सुरूवातीलाच ऐन पावसाळ्याच्या तोंडांवर शहरातील पूल पाडून ठेवला त्याला पर्यायी रस्ताही उपलब्ध करुन दिलेला नाही त्यामुळे शहरातील सर्व व्यापारीही अडचणीत आले आहेत.तसेच आता म्हणे शहरातील वैभव असलेले कमानवेस पाडून मोठा रस्ता करायचा आहे.जर असे केले तर शहराचे वैभव संपुष्टात येईल.तसेच डि.पी.प्लॅनच्या संदर्भातही एकाधिकार शाही ने बनविला आहे.जे काहि नगर पंचायत करत आहे हे कुणाच्यासांगण्यावरून करते हे सगळ्यांना माहित आहे.असा टोलाही आ.बाळासाहेब अजबे यांनी आ.सुरेश धस यांचे नाव न घेता लगवला आहे.

No comments:

Post a Comment