Thursday, July 23, 2020

महिला बाल प्रकल्प अधिकारी मोरे यांनी नग्न फोटो व्हटआॕप ग्रूपवर टाकल्या प्रकरणी यांना बडतर्फ करा-भोसले


बीड (प्रतिनीधी )ः- महिला बाल प्रकल्प अधिकारी जगदीश मोरे यांने शासनाच्या आयसीडिसी अर्बन अंगणवाडी कर्मचारी या व्हॉटसऍप ग्रुपवर आपला नग्न स्वरुपाचा फोटो टाकला. यात संबंधीत अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई झाली असली तरी त्या अधिकार्‍याला बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी दिलीप भोसले यांनी केली आहे.
प्रकल्प अधिकारी जगदीश मोरे यांने आपला नग्न स्वरुपाचा फोटो आयसीडिएस या व्हॉटसऍप ग्रुपवर टाकला होता. या प्रकरणाने संताप व्यक्त केला जात आहे. याची दखल प्रशासनाने घेवून त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असली तरी सदरील अधिकार्‍यांस बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य धनश्री अंगणवाडी सेवीका मदतनीस कर्मचारी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष दिलीप भोसेले यांनी केली. या प्रकरणी कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा ईशारा दिलीप भोसले सह संगमित्रा शेजवळ, माया खवतळ, राधा कल्याणकर, संजीवणी ठोंबरे, जाधव संगिता, आढाणे ललीता, सुनिता विद्याधर, सुनंदा चांदणे यांनी दिला आहे.दरम्यान या बाबतचे निवेदन महिला बालकल्याण उपायुक्त यांच्याकडे पाठविण्यात आलेले आहे. दरम्यान, जगदीश मोरे याच्या या कृत्याबद्दल यसर्वस्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. सदरील हा अधिकारी वादग्रस्त म्हणून परिचीत आहे त्यामुळे त्याला बडतर्फीची कारवाई करणे योग्य आहे.

No comments:

Post a Comment