Friday, July 17, 2020
सौ.मालनबाई देविदासराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय सिरसाळाच्या विद्यार्थ्यांनी कायम ठेवली निकालाची उज्ज्वल परंपरा.
सिरसाळा;- (प्रतिनीधी) येथील 'लोणार शिक्षण प्रसारक मंडळ कान्नापूर संचलित',सौ, मालनबाई देविदासराव देशमुख. कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेच्या निकालात दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी बाजी मारली असून ,महाविद्यालयाचा ग्रामीण भागात सर्वाधिक 95.5 % निकाल लागला आहे. महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल 100% तर कला शाखेचा निकाल 87.5% इतका लागला आहे, विज्ञान शाखेच्या चि, महात्मे निवृत्ती अंकुश, यांनी 81.53% घेऊन प्रथम क्रमांक पटकावला आहे ,तसेच चि, नखाते उत्तरेश्वर परमेश्वर व कु, पवार सुप्रिया दिगंबर यांनी अनुक्रमे 80.53% व 78.84% घेऊन विज्ञान शाखेतून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. कला शाखेतून कुमारी गायकवाड पूजा प्रकाश हिने 79.67% घेऊन प्रथम क्रमांक पटकावला.तर कु,अवधूत वैष्णवी लक्ष्मीकांत व चि, चव्हाण विश्वनाथ रामराव यांनी अनुक्रमे 76.61% व 74.15% घेऊन कला शाखेतून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांच्या ह्या यशाबद्दल लो. शी. प्र.मं. चे अध्यक्ष श्री प्रवीणजी देविदासराव देशमुख व शालेय समितीचे सर्व सदस्य तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य जाधव व्ही पी, रंजवे एम व्ही ,झोडगे ए यु ,काकडे व्ही एस ,सोनवणे व्ही बी ,जाधव ए एस, पौळ ए एम, शेख अबूददीन सर यांनी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment