Thursday, July 16, 2020

बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर.यावर्षी ही परीक्षेत मुलींची बाजी.


बीड (प्रतिनीधी ):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहिर करण्यात आला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात ४.७८ टक्के वाढ झाली आहे. यावर्षीही राज्यात मुलींनीच बाजी मारली असून कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९५.८९ टक्के तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी ८८.१८ टक्के लागला आहे. बीड जिल्ह्यातून ४० हजार ६५१ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.  बीड जिल्ह्याचा निकाल ८८.८३ टक्के लागला. 
राज्य मंडळातर्फे पुणे, नागपुर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापुर, अमरावती, नाशिक, लातुर, कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी, मार्च २०२० मध्ये इयत्ता १२ वीची परीक्षा घेण्यात आली होती. राज्यभरातून परीक्षेसाठी १४ लाख २० हजार ५७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १४ लाख १३ हजार ६८७ एवढी होती. त्यापैकी १२ लाख ८१ हजार ७१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलींचा निकाल मुलींचा निकाल ९३.९८ टक्के तर मुलांचा निकाल ८८.०४ टक्के लागला आहे. कोरोनामुळे इयत्ता १२ वीच्या उत्तर पत्रिका तपासण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे निकाल जाहिर करण्यास विलंब होत होता. विद्यार्थी व पालकांची निकालाबाबतची उत्सुकता अखेर आज संपली. बीड जिल्ह्यात ४० हजार ६५१ विद्यार्थ्यांनी इयत्ता १२ वीची परीक्षा दिली. 
बीडमध्येही मुलींचीच बाजी
बीड जिल्ह्यात इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी ४० हजार ६५१ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ३४ हजार ५४४ विद्यार्थी पास झाले असून जिल्ह्याचा निकाल ८८.८३ टक्के लागला असून मुलींनी बाजी मारत ९१.६४ टक्क्यांवर उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळवला तर  ८७.१४ टक्के मुले पास झाले. विज्ञान शाखेचा निकाल ९४.९९  टक्के तर कला शाखेत ८१.३७ टक्के तर वाणिज्य शाखेत ९२.७२ टक्के मुले पास झाले आहेत. 

* विभागीय मंडळनिहाय निकाल
पुणे ९२.५० टक्के, नागपुर ९१.६५ टक्के, औरंगाबाद ८८.१८ टक्के, मुंबई ८९.३५ टक्के, कोल्हापुर ९२.४२ टक्के, अमरावती ९२.०९ टक्के, नाशिक ८८.८७ टक्के, लातुर ८९.६९ टक्के, कोकण ९५.८९ टक्के एवढा लागला आहे.

No comments:

Post a Comment