परळी वैजनाथ ;--- सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालक मंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नामदार धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी यांनी कोरोनावर यशस्वी मात करून प्लाझ्मा डोनेट करून आपल्या लाडक्या नेत्याला अशी ही अनोखी भेट दिली आहे. प्रशांत जोशी यांनी आपल्या क्लासमेट थेरपी डोनेट केल्याचे फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे.या पोस्टमध्ये सांगितले आहे कि,
सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनावर मी यशस्वीपणे मात केली. राज्यभर आजही माझे अनेक बांधव कोरोनाशी झुंज देत आहेत. त्यांचे स्वास्थ्य सुधारण्यासाठी माझा हातभार लागावा या सामाजिक जाणिवेतून मी आज प्लाझ्मा डोनेट करून माझे साहेब
@Dhananjay_munde
यांना वाढदिवसाची अनोखी भेट दिली.
No comments:
Post a Comment