बीड (प्रतिनीधी )- बीड जिल्ह्यात कोरोना बाधीतांमध्ये प्रचंड वाढ होत असून रोज दोन तासाला शेकड्यावर कोरोना संशयितांची तपासणी होत आहे. आज प्राप्त झालेल्या ४७० संशयितांच्या अहवालापैकी तब्बल १९ जण कोरोनाबाधीत आढळले असून ४५१ जणांचा रिपोर्य निगेटिव्ह आला आहे. त्यामध्ये बीड शहरातील सात जण, परळी सहा, गेवराई दोन, आष्टी एक, माजलगाव एक, अंबाजोगाई दोन जणांचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यामध्ये कोरोना बाधीतांच्या संख्येत प्रचंड वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे बाधितांच्या संपर्कात आलेल्या शेकडो संशयितांचा स्वॅब घेऊन तो तपासला जात आहे. आज दुपारी १२ वा. १५ मिनिटाला ४७० संशयितांच्या स्वॅबचा अहवाल प्राप्त झाला. यामध्ये ४५१ जण निगेटिव्ह आढळले तर तब्बल १९ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये बीड शहरातील २८ वर्षीय, २४ वर्षीय, ३६ वर्षीय, ७० वर्षीय पुरुष तर ५० वर्षीय महिला ही लिंबागावची रहिवासी असून ३२ वर्षीय महिला ही राणूमाता मंदिर मागे शाहूनगर येथील पॉझिटिव्ह रुग्णांच्या सहवासातील आहे. ६३ वर्षीय पुरुष हा माळीवेस चौक येथील असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. बीडमध्ये हे सात रुग्ण आढळले असून परळी येथे ६ रुग्ण (यामध्ये ३० वर्षीय महिला, ३२ वर्षीय पुरूष, २४ वर्षीय महिला, रा.भिमनगर, परळी, १२ वर्षीय पुरूष रा.सिध्दार्थ नगर (परळी येथील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्याने बाधीत
२८ वर्षीय पुरूष-रा. इंद्रा नगर (परळी येथील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्याने बाधीत), ५० वर्षीय महिला जुने रेल्वे स्टेशन परिसर,(परळी एसबीआय ग्राहक ), तर गेवराई २ (२३ वर्षीय पुरूष रा.रामनगर, तलवडा (पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्याने बाधीत), ५४ वर्षीय पुरूष रा.रंगार चौक गेवराई) आष्टी १ (४५ वर्षीय पुरूष रा.दत्त मंदीर गल्ली (पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्याने बाधीत), माजलगाव १ (२४ वर्षीय पुरूष रा. जदीद जवळा), अंबाजोगाई २ (४३ वर्षीय महिला, ८ वर्षीय पुरूष रा. विमल सृृष्टी बीड रोड मोरेवाडी ता.अंबाजोगाई (बार्शी येथून आलेले) असे १९ कोरोनाबाधीत आज जिल्ह्यात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
बलात्कारातील आरोपीला कोरोना
आज आलेल्या अहवालामध्ये माजलगाव तालुक्यातील जदीदजवळा येथील एका रुग्णाचा समावेश असून सदरील बाधीत हा बलात्कार प्रकरणातील आरोपी आहे. जेल क्वारंटाईन असताना त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. सदरच्या व्यक्तीविरोधात ८ जुलै रोजी माजलगाव ग्रामीण पोलिसात ३७६ नुसार गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर १३ जुलैला त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यामुळे त्याला बीड न्यायालयाच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. या आठ दिवसांच्या कालखंडात माजलगाव ग्रामीणचे काही पोलिसही त्याच्या संपर्कात आले होते. त्याचबरोबर क्वारंटाईन सेंटरमध्येही तो किती जणांच्या संपर्कात आला याची माहिती आरोग्य विभाग घेत आहे.
No comments:
Post a Comment