Tuesday, July 14, 2020

कोरोनाचा वाढता प्रभाव रोकण्यासाठी केजच्या नागरिकांनी नियमाचे पालन करावे;- तहसीलदार दुलाजी मेंडके

केज (प्रतिनीधी )- बीड जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे प्रशासनाच्या वतीने नियमाचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. केज शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमाचे पालन करावे आणि अनावश्यक गर्दी टाळावी, जेणे करून कोरोनाचा संसर्ग होणार नाही, असे आवाहन तहसीलदार दुलाजी मेंडके यांनी केले आहे. 
 गेल्या तीन महिन्यांपासून तहसीलदार, न.प.चे सीओ आणि पोलिस अधिकारी कोरोनाबाबत जाणीवजागृती करत आहेत. केज शहरासह ग्रामीण भागात रुग्णांची संख्या वाढू नये याबाबतची काळजी प्रशासन घेत आलेलं आहे. मात्र जिल्हाभरात गेल्या पंधरा दिवसांपासून रुग्णांची संख्या वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे. प्रशासनाने ज्या नियमावली घालून दिलेल्या आहेत त्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन तहसीलदार दुलाजी मेंडके यांनी केले आहे तसेच नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी, व प्रत्येकाने मास्कचा वापर करावा, असेही मेंडके यांनी तालुक्यातील जनतेला आवाहन केले.

No comments:

Post a Comment