पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजेभाऊ फड, निरिक्षक नरेंद्र काळे,अँड.माधव जाधव, उत्तम माने,तालुकाध्यक्ष बाबा शिंदे, जीवनराव देशमुख व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आदींच्या उपस्थितीत
.........................................
परळी (प्रतिनिधी)-राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेत, उमेदवारांना समान संधी मिळावी म्हणून १६ आणि १७ नोव्हेंबर या शेवटच्या दोन दिवसांत ऑनलाइन तसेच पारंपरिक (ऑफलाइन) पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहेत.असा निर्णय घेण्यात आला.परळी नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संध्या देशमुख व इतर नगरसेवक पदाचे उमेदवार अतिशय साध्या पध्दतीने उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करून, अवाढव्य खर्च केला जातो. या खर्चाला फाटा देत. कुठले शक्तिप्रदर्शन न करता अकारण खर्च न करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार दिनांक १७ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजेभाऊ फड, निरिक्षक नरेंद्र काळे, अँड.माधव जाधव, उत्तम माने,तालुकाध्यक्ष बाबा शिंदे, जीवनराव देशमुख व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आदींच्या उपस्थितीत भरणार आहेत.दरम्यान , कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आव्हान करण्यात आले आहे. परंतु, कुठलाही गाजावाजा शक्तिप्रदर्शन न करता साधेपणाने परळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सध्या दीपक देशमुख व नगरसेवक १७ नोव्हेंबर रोजी अर्ज करणार दाखल करणार आहेत. ढोल बाज्या, गाड्या वगैरे असे शक्ती प्रदर्शन न करता साध्या पध्दतीने उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
No comments:
Post a Comment