Wednesday, November 12, 2025

भगवान काळभैरवनाथ हे भक्तांच्या श्रद्धेचे रक्षण करणारे देव आहेत-ह.भ.प. जनाई महाराज कोकाटे.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  परळी शहरातील मध्यवर्ती श्री काळभैरव संस्थान येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री काळ भैरवनाथांचा जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि धार्मिक उत्साहात साजरा करण्यात आला. या पवित्र सोहळ्याच्या निमित्ताने झालेल्या ह.भ.प. जनाई महाराज कोकाटे यांनी किर्तनासाठी अभंग पिकलिया सेंधन कडूपणा गेले तसे आम्हा केले पांडुरंग आठवण गेले बाबा झाला स्वयंव पांडुरंग या अभंगावर कीर्तन केले ब्रह्मा आणि विष्णू मध्ये श्रेष्ठत्व करता भांडण लागलं ब्रह्मदेव म्हणायला लागले मी श्रेष्ठ विष्णू देव म्हणायला लागले मी श्रेष्ठ दोघात जोरात भांडण लागलं सगळे देवता लोक पहात राहिले आता सर्वात महान देव म्हणजे ब्रह्म आणि विष्णू यांचा वाद मिटवणं म्हणजे अशक्य कोणाला शक्य होत नव्हतं काय करावं काही कोणाला कळेना मग हे दोघेजण चारही वेदा जवळ आले ऋग्वेद अथर्ववेद सर्व चारही वेदांना विचारलं की श्रेष्ठ कोण आहे ते सगळे म्हणू लागले सर्वात श्रेष्ठ एकच आहे ते म्हणजे भगवान शंकर जी भगवान शंकर जी एवढा श्रेष्ठ या भूतलावरती या जगात या ब्रम्हांडामध्ये कोणीच नाहीये एवढे शक्तिमान एवढी शक्ती भगवान शंकर जिकडे आहेत ते सर्वात श्रेष्ठ असे म्हटल्यानंतर परत दोघांमध्ये युद्ध चालू झालं काय करावं काही कळेना देवाला वाटला आता आपण अवतार घेतल्याशिवाय काही पर्याय नाही आपण गेलंच पाहिजे आणि या दोघांमधला जो वाद आहे तो वाद आपण मिटवला पाहिजे म्हणून साक्षात शिव परमात्म्याने काल रूप धारण केलं आणि कालरूप धारण केल्याच्या नंतर ब्रह्मदेव जोर जोरात हसायला लागले की देवाने काल रूप धारण केले म्हणून मी श्रेष्ठ मी श्रेष्ठ मग ब्रह्मदेवाचे जे पाचवंशीर होतं ते क्रोधाहीन झालं आणि मग भगवान परमात्माला हे सहन झालं नाही म्हणून देवाने जे ब्रह्मदेवाचा शीर होता ते धडा वेगळं केलं ते दहा दिशा भूतला वरती येऊन पडलं पण ज्या ठिकाणावरती ते शीर पडलं त्या ठिकाणाला कपाल मोचन  तीर्थ असे म्हणतात आणि म्हणून त्या देवाला कालभैरव असं म्हणयात आले आज त्यांचा जयंती उत्सव संपन्न झाला  त्यानिमित्ताने कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे  यांच्या कीर्तनाने वातावरण भक्तीरसात न्हाऊन निघाले.
कीर्तनादरम्यान ह.भ.प. जनाई महाराज कोकाटे यांनी आपल्या ओजस्वी आणि प्रभावी वाणीमधून श्री काळभैरवनाथांचा परिचय भक्तिपूर्ण रीतीने करून दिला. त्यांनी सांगितले की, “भक्ती म्हणजे आत्म्याचा स्वच्छ आरसा असून त्या आरशात श्रद्धेचा प्रकाश पडला की काळभैरवनाथ स्वतःचे खरे दर्शन भक्तांना घडवतात.”
या प्रवचनातून त्यांनी काळभैरवनाथांच्या तेजस्वी स्वरूपाचे, धर्मरक्षणाच्या कार्याचे आणि भक्तावर असलेल्या त्यांच्या कृपेचे अनेक प्रसंग सांगून भाविकांना अध्यात्मिक उंचीचा अनुभव दिला.
कीर्तनाच्या शेवटी झालेल्या महाआरतीवेळी ‘जय श्री काळभैरवनाथ’च्या घोषणा घुमल्या, तर गुलाल उधळत भक्तांनी श्रींच्या दर्शनाचा आनंद लुटला. यावेळी अखिल भारतीय वारकरी भजनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ह भ प श्री रामेश्वर महाराज कोकाटे, कन्हैया आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गोविंद महाराज मुंडे व सर्व विद्यार्थी उपस्थित होते गायनासात वैजनाथ महाराज पांचाळ वर्षाताई गिरी, आशाताई केंद्रे, मनिषा ताई शेप यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमानुसार पहाटे अभिषेक, दुपारी पूजा-अर्चा व महाप्रसाद, सायंकाळी कीर्तन आणि मध्यरात्री जन्मोत्सव आरती असा दिवसभराचा धार्मिक उत्सव पार पडला.
संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. भरत महाराज जोगी यांनी सांगितले की, “काळभैरवनाथ भक्ती परंपरेचा वारसा पुढे नेण्यासाठी हा उत्सव भाविकांसाठी अध्यात्मिक ऊर्जेचा केंद्रबिंदू ठरतो. श्रींचा आशीर्वाद नेहमी भक्तांच्या पाठीशी राहतो.”
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री काळभैरव संस्थानचे कार्यकर्ते व भाविकांनी मोठ्या उत्साहाने परिश्रम घेतले.संपूर्ण परळी शहरात या भक्तीमय उत्सवाचे वातावरण अनुभवास आले.

No comments:

Post a Comment