Saturday, November 15, 2025

निवडणूक आयुक्तांचे पत्र. नगर परिषद निवडणुक रविवारीही स्वीकारणार उमेदवारी अर्ज.

मुंबई (प्रतिनिधी)  राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम दि.४/११/२०२५ रोजी प्रसिध्द करण्यात आलेला होता. या निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पन्ने संगणकप्रणालीद्वारे ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येत आहेत. परंतु या संगणक प्रणालीद्वारे स्विकारण्यात येणाऱ्या नामनिर्देशन पत्रामध्ये अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. नामनिर्देशन पत्रे सादर करण्याकरिता शेवटचे दोन दिवस शिल्लक राहीले आहेत. अशा परिस्थितीत संगणकप्रणालीवर भार येण्याची शक्यता लक्षात घेता आणि उमेदवारांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनातून राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वपूर्ण निर्देश देत आहेत

 दि.१५/११/२०२५ ते दि. १७/११/२०२५ या कालावधीमध्ये (तीनही दिवस), (रविवार दि.१६/११/२०२५ या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील) दररोज सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजे पर्यंत उमेदवारांना दोन्ही पध्दतीने म्हणजेच संकेतस्थळावर (online) तसेच पारंपारिक (offline) पध्दतीने सुध्दा आपले नामनिर्देशनपत्रे आवश्यक कागदपत्रांसह संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे सादर करता येतील. याबाबत सर्व संबंधितांना आपल्या स्तरावरून सूचना निर्गमित कराव्यात असे आदेश राज्य निवडणूक आयुक्त यांनी काढले आहेत.यामुळे रविवारी असलेल्या सुट्टीच्या दिवशीही उमेदवार अर्ज दाखल करू शकणार आहेत.

No comments:

Post a Comment