परळी वैजनाथ (प्रतिनिधी) आपल्या भागातील परिसरातील समाज बांधवांना निमंत्रीत करण्यात येते की सकल मराठा परिवाराच्या वतीने महारक्तदान शिबीराचे आयोजन दिनांक 16 नोव्हबर रविवार रोजी पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी करण्यात आले आहे तरी या महारक्तदान शिबीरास आपल्या भागातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे. रक्तदान हे जीवनदान आहे. आपण केलेल्या रक्तदानामुळे समाज बांधवांचे तसेच गरजू लोकांनचे प्राण वाचतील या मानवतेच्या भावनेतून निश्चितच जीवनदान मिळाले. म्हणून सर्वांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करावे असे आवाहन कांतीकारी साथी च्या मुख्यसंपादक, आईसाहेब जिजाबाई सेवा संस्था, व जय महाराष्ट्र महिला संघटनेच्या अध्यक्षा सौ वर्षा मगर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment