Wednesday, November 5, 2025

संत मन्मथस्वामी भक्त कपिलधारहून परळीच्या प्रभू वैद्यनाथाकडे वीरशैव लिंगायत समाज व श्री मन्मथस्वामी सेवा संघ यांच्या वतीने हजारो भाविकांना खिचडी प्रसाद वाटप.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) क्षेत्र कपिलधार येथील श्री संत शिरोमणी मन्मथस्वामींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेवून आपआपल्या गावी परतणार्‍या वीरशैव लिंगायत बांधवांची पाऊले बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर रोजी परळीतील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले श्री क्षेत्र वैद्यनाथ प्रभूंच्या दर्शनासाठी वळत असून परळीत यावे श्रीं चे दर्शन घ्यावे असे समिकरणच आता रूढ झाले आहे. एकीकडे भाविकांची गर्दी वाढत असतांना त्यांना आपल्याला घडेल त्या श्रद्धेतून त्यांच्यासाठी खिचडी, चहा, पाणी व अन्य अन्न पदार्थाचा महाप्रसादही परळीतील वीरशैव लिंगायत समाजाच्या श्री मन्मथ स्वामी सेवा संघाचे सर्व पदाधिकारी, व सदस्य गेल्या 18 वर्षापासून करीत आहेत. श्री व सौ भाग्यवंत आप्पा यांच्या हस्ते श्रींचे पूजन करण्यात आले.
श्री संत श्री संत मन्मथ स्वामी सेवा संघाचे शिवराजआप्पा बोटूळे  रघुनाथ आप्पा भाग्यवंत व उज्वला भाग्यवंत यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.शिवराज आप्पा बोटुळे, रामकिशन आप्पा साखरे, सोमनाथ आप्पा ओपळे, प्रकाश धोकटे, संजय कोरे बालाजी सेलुकर, रघुनाथ आप्पा भाग्यवंत, संदीप हालगे, महादेव मोडीवाले, शिवाजी बुद्रे, राजाभाऊ खोत व  सहकाऱ्यांच्या  पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.  
श्रीक्षेत्र कपिलधारहुन दर्शन घेऊन परत येणार्‍या भाविकांसाठी बुधवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून येथील श्री संत गुरुलिंग स्वामी मठ संस्थान बेलवाडीमध्ये येथे वीरशैव लिंगायत समाजाच्या श्री मन्मथ स्वामी सेवा संघाच्या वतीने खिचडी प्रसादाचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी ठेवण्यात आला.  श्री मन्मथ स्वामींच्या  यात्रेत सहभागी झालेल्या भाविकांची पाऊले आता आपआपल्या घराकडे वळत असतांना श्री क्षेत्र परळी येथे वैद्यनाथ प्रभूंच्या दर्शनाकडेही वळाली आहेत.
आज दिवसभर भाविक मोठ्या संख्येने परळीत दाखल झाले आहेत. मागील 18 वर्षापासून ही परंपरा परळीमध्ये वीरशैव समाज व श्री मन्मथ स्वामी सेवा संघ हे जपत आहेत. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वीरशैव महासभेचे बीड जिल्हा अध्यक्ष दत्ताप्पा इटके गुरुजी, अ‍ॅड. मनोजआप्पा संकाये, पत्रकार श्री संजय खाकरे, संतोष जुजगर, संपादक बालाजी ढगे आदी उपस्थित होते.

*बेलवाडी परिसराला आले जत्रेचे स्वरूप*

श्रीक्षेत्र कपिलधार येथील श्री संत मन्मथ स्वामी यांच्या पवित्र समाधी स्थळाचे दर्शन घेऊन आंध्रप्रदेश कर्नाटक, तामिळनाडू व महाराष्ट्रातील विविध भागातून आलेले हजारो भाविक भक्तांनी आज बुधवारी परळी येथील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले प्रभुवैद्यनाथाचे दर्शन घेतले. परळीत आलेल्या भाविकांची महाप्रसादाची व्यवस्था वीरशैव लिंगायत समाज, श्री मन्मथ स्वामी सेवा संघ यांच्या वतीने करण्यात आली होती. महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी हजारो भावीक भक्तांनी गर्दी केल्याचे दिसून आले. दरम्यान बेलवाडी परिसरात बेल, फुल, नारळ आदी प्रसादालयाची दुकाने मोठ्या संख्येने घातली गेली होती त्यामुळे वैजनाथ मंदिर परिसराला जणू काही जत्रेचे स्वरूप आल्याचे दिसून आले.

No comments:

Post a Comment