केज (प्रतिनिधी) वडिलांच्या हत्येला एक वर्ष झाले तरी आजही आम्ही न्यायाची वाट पाहत आहोत. समाजाने आजपर्यंत दिलेली साथ यामुळेच हा लढा आम्ही लढतो आहोत. मी त्यांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न नक्की पूर्ण करेन; मात्र ते माझ्यासोबत नसतील, याचं वाईट वाटतं, असे मस्साजोगचे माजी सरपंच स्व. संतोष देशमुख यांची वैभवी देशमुख हिने भावना अनावर कन्या होत सांगितले.
ज्या लोकांनी निष्पाप भावाला संपवले त्यांना फाशीची शिक्षा भेटल्यावरच आमचा समाधानाचा दिवस असेल. या प्रकरणाचे आरोपपत्र येत्या १२ डिसेंबरला होईल, असे धनंजय देशमुख यांनीसांगितले.
दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेला शनिवारी तिथीप्रमाणे एक वर्ष पूर्ण झाले.
तुमच्या मागण्या कृतीतून पूर्ण करेन : अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख यांच्याशी संवाद साधला.
तुमच्या मागण्या कृतीतून पूर्ण करून दाखवत आहे, असे पवार यांनी सांगितले असून, देशमुख कुटुंबाला विशेष मदतीचे आश्वासन दिले आहे.
No comments:
Post a Comment