Sunday, November 23, 2025

जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणार? उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संकेत.


मुंबई - महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान २ डिसेंबर रोजी होणार आहे. ३ डिसेंबर रोजी निकाल लागणार आहे. दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. पण या निवडणुका लांबणीवर जाणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. जिल्हा परिषदेतील आरक्षणाबाबत कोर्टात सुरू असलेल्या प्रकरणाने निवडणूक लांबण्याची शक्यता अजित पवार यांनी व्यक्त केली. ते नळदुर्गमध्ये प्रचारसभेत बोलत होते.

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद (Zilla Parishad) आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरक्षणाची मर्यादा ५० टक्के ओलांडल्यामुळे निवडणुका लांबणीवर पडू शकतात. यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. २५ तारखेला सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. याबाबत अजित पवार यांनी आपले मत व्यक्त केलेय. सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या प्रकरणामुळे निवडणूक लांबणीवर जाऊ शकते असं अजित पवार म्हणाले.

No comments:

Post a Comment