Friday, November 14, 2025

परळी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक चौथ्या दिवशी नगराध्यपदासाठी 1 तर नगरपरिषद सदस्यपदासाठी 10 अर्ज दाखल .

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- नगरपालिके च्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. १७ प्रभागांमधील ३५ जागां साठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला
सुरू झाली असून सोमवारी (दि. १७) दुपार ३ पर्यंत अर्ज दाखल करता 
येणार आहेत. दि. 13 नोव्हेंबर पर्यंत 
नगरपरिषद सदस्य पदाकरिता 10 
अर्ज आणि नगराध्यक्ष पदाकरिता 
1 असे एकू ण 11 नामनिर्देशनपत्र परळी 
वैजनाथ नगरपरिषद निवडणूक विभागात 
दाखल करण्यात आले आहेत. अर्ज दाखल 
करण्यासाठी शनिवारी उमेदवारी अर्ज
भरता येणार आहे. तर रविवारी 
सुट्टी आहे अशी माहिती निवणूक 
विभागाकडून देण्यात आली आहे. 
राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूक- 
2025 साठीचा कार्यक्रम 4 
नोव्हेंबर रोजी घोषित के ला आहे. 
त्या दिनांकापासून आदर्श आचार 
संहिता अं मलात आली आहे.                            ------------------------------------
संहिता लागू आहे. येथील नगराध्यक्ष त्याचबरोबर १७ प्रभागांतील 
३५ नगरसेवक पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला 
सुरूवात झाली असून, नगरपालिके च्या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर यांच्या कक्षात अर्ज स्वीकारले जात आहे. १७ प्रभागांसाठी प्रत्येकी दोन अशा एकूण ३४ कर्मचारी तसेच नगराध्यक्ष पदासाठी दोन कर्मचारी व त्यांना 
साहाय्य करण्यासाठी १८ तलाठी नियुक्त आहेत. नामनिर्देशन पत्रासोबत 
अनामत रक्कम स्वीकारण्यासाठी स्वतंत्र दोन कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती
के ली आहे.नगर परिषद क्षेत्रातील 79,569 मतदार मतदानाचा हक्क 
बजावणार आहेत, त्यात 41,023 पुरुष, 38,543 महिला आणि 3 
इतर मतदार आहेत. मतदानासाठी 88 केंद्रे निश्चित के ली आहेत. अर्ज
दाखल दि. १० नोव्हेंबर पासून सुरुवात व अं तिम तारीख 17 नोव्हेंबर, 
छाननी 18 नोव्हेंबर, अर्ज मागे घेण्याची मुदत 19 ते 21 नोव्हेंबर, चिन्ह
वाटप 26 नोव्हेंबर, मतदान 2 डिसेंबर, आणि मतमोजणी 3 डिसेंबर रोजी 
सकाळी 10 वाजता होईल. नगर परिषद निवडणुकीसाठी सोमवारपासून 
ऑनलाईन अर्ज भरणे सुरू झाले असून, त्या भरलेल्या अर्जाची एक प्रत 
निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे द्यायची आहे. येथील नगर 
परिषदेच्या इमारतीमध्ये निवडणूक कक्ष तयार करण्यात आला आहे. 
निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर, सहायक निवडणूक 
निर्णय अधिकारी त्र्यंबक कांबळे,सहायक निवडणूक निर्णय अधिकारी 
तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नायब तहसीलदार परवीन पठाण, नायब 
तहसीलदार पंडित सुरवसे, नगर परिषद उपमुख्याधिकारी संतोष 
रोडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित आहेत. चोख पोलिस 
बंदोबस्त ठे वण्यात आला आहे. २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 
या लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. परळी 
वैजनाथ नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक क्षेत्रातील संपूर्ण मतदारांनी 
मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी 
तथा उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर यांनी के ले.
आता पर्यंत नगराध्यक्षपदासाठी 1 तर नगरपरिषद सदस्यपदासाठी 
10 उमेदवारी अर्ज दाखल
 परळी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू 
झाली असून, सोमवार दि. १० नोव्हेंबर रोजी एकही अर्ज प्राप्त नाही, 
मंगळवार दि. ११ नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष पदासाठी सय्यद रशिदाबी 
शफाकत अली यांचा
अर्ज दाखल. 
, प्रभाग क्रमांक 3 सर्वसाधारण महिला प्रवर्गातून सय्यद रशिदाबी 
शफाकत अली, प्रभाग क्रमांक 16 सर्वसाधारण प्रवर्गातून बागवाले 
कु शक कमलबाई यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला. बुधवार दि.१२ नोव्हेंबर रोजी प्रभाग क्रमांक 2- सर्वसाधारण प्रवर्गातून सय्यद जुबेर अली शफाकत अली, प्रभाग क्रमांक 3- सर्वसाधारण महिला प्रवर्गातून खान शाहीन नय्युम, प्रभाग क्रमांक 10-अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून पारधे दिपाली किशोर यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. गुरुवार दि.१३ नोव्हेंबर रोजी प्रभाग क्रमांक 6- सर्वसाधारण प्रवर्गातून लोखंडे 
दत्ता विष्णू, प्रभाग क्रमांक 8 - अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून कांबळे 
नंदिनी विश्वजीत, प्रभाग क्रमांक- 8 सर्वसाधारण प्रवर्गातून आचार्य रवि
किशन, प्रभाग क्रमांक 9-सर्वसाधारण महिला प्रवर्गातून शेख इरशाद 
रजियोद्दिन आणि शेख यास्मीन बेगम शमशोद्दीन यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला असून आता पर्यंत दिनांक 13 नोव्हेंबर पर्यंत नगर परिषद सदस   पदाकरिता 10 अर्ज आणि नगराध्यक्ष पदाकरिता 1 असे एकू ण 11 नाम निर्देशनपत्र परळी वैजनाथ नगरपरिषद निवडणूक विभागात दाखल 
करण्यात आले आहेत. 

 *शनिवारी उमेदवारी अर्ज भरता येणार, रविवारी सुट्टी* 

नगरपालिका निवडणुकीसाठी शनिवारीही उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाकडे पत्र पाठवून सदर बाब स्पष्ट के ली आहे १६ नोव्हेंबर रोजी रविवारी सुट्टीच्या
दिवशी उमेदवारी अर्ज स्विकारले जाणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले 
आहे. राज्य निवडणूक आयोगाने तातडीने राज्यातील सर्वजिल्हाधिकारी 
कार्यालयांना पत्र पाठविले आहे. यामध्ये शनिवारी १५ नोव्हेंबर रोजी 
सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज स्विकारले जावे अशा 
स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
--------------------------------------

No comments:

Post a Comment