Tuesday, June 7, 2022

भोकर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक.


भोकर (प्रतिनीधी भोकर तालुक्यातील शेतकऱ्यांना बी बियाण्यासाठी , पीक कर्जासाठी खूप जास्त प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यासाठी आज  विधानसभा अध्यक्ष प्रमोद देशमुख , जिल्हा उपाध्यक्ष जवाजुद्दीन बरबडेकर ,  तालुकाध्यक्ष इंजिनियर विश्वंभर पवार व शहर अध्यक्ष डॉ फेरोज इनामदार यांनी तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांसह तहसीलदार यांच्यासोबत एक बैठक करून त्वरित या संदर्भात बँकेच्या सर्व शाखा अधिकाऱ्यांसोबत व कृषी दुकानदारासोबत बैठक लावण्याचा आग्रह केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पवित्रा बघून मा तहसीलदार साहेबांनी सुद्धा त्वरित आदेश काढून याच आठवड्यात या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले , अगोदरच मान्सून उशिरा होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला असून त्यातच बँकेच्या अधिकाऱ्यांची मुजोरी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे शेतकर्यासोबत उद्धट बोलणे त्यांच्या फायली त्यांच्या अंगावर फेकणे , वर्षानुवर्षे त्यांचे फाईली निकाली न काढणे ह्या सर्व प्रकारामुळे तालुक्यातील शेतकरी वैतागलेला आहे या सर्व बाबी लक्षात घेता भोकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतलेली आहे , येणाऱ्या काळात जर शेतकऱ्यांचे प्रश्न लवकर सुटले नाही तर लोकशाही मार्गाने भोकर तालुक्यात आंदोलने करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मागेपुढे पाहणार नाही असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विश्वम्बर पवार व शहर अध्यक्ष डॉ फेरोज खान इनामदार यांनी प्रतिनिधीशी बोलताना केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  विधानसभा सचिव विशाल जैन , पंकज देशमुख भोसीकर , बालाजी पाटील गौड , संजय मुरगुलवार , युवक तालुकाध्यक्ष गणेश बोलेवार , यु शहराध्यक्ष अफरोझ पठाण , आनंद पाटील सिंधिकर , रवी गेंटेवार , विजय पाटील सोळंके , डॉ विजय बोदीरवाड , आशिष अनंतवार , सिद्धू पाटील चिंचालकर सह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तथा कार्येकर्ते व शेतकरी उपस्थित होते

No comments:

Post a Comment