Tuesday, June 7, 2022

नितीन लोढा यांच्यावर प्राणघातक हल्ला .चौसाळा शहर पन्नास टक्के बंद.

बीड (प्रतिनिधी) चौसाळा येथील शिवसेनेचे युवा नेते तथा भिमाशंकर शुगर मिल्सचे चेअरमन नितीन लोढा यांच्यावर गुजांळ नावाच्या व्यक्तीने पोखरी(कोयता)सारख्या शस्ञाने हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास चौसाळा येथे घडली या हल्ल्यात लोढा जखमी झाले असुन त्यांना बीड येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते पंरतु त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना औरंगाबाद येथे खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे 
बीड तालुक्यातील चौसाळा येथील शिवसेनेचे युवा नेते तथा भिमाशंकर शुगर मिल्सचे चेअरमन नितीन लोढा हे आपल्या घरामध्ये असताना बाहेर आलेल्या गुजांळ नावाच्या व्यक्तीने त्यांना बाहेर येण्यास सांगितले त्यावर लोढा यांनी उधा भेटु असे सांगितले माञ तो व्यक्ती पुन्हा पुन्हा  लोढा यांना बाहेर  बोलावत होता त्यामुळे लोढा घराबाहेर आले असता गुजांळ नावाच्या व्यक्तीने हातातील धारदार शस्ञाने नितीन लोढा यांच्या डोक्यावर आणी डोळयाजवळ वार केले या हल्ल्यात नितीन लोढा जखमी झाले असुन त्यांना तात्काळ बीड येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते पंरतु त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे .सदरील घटनेनंतर पोलिसांनी एका धाब्यावरून गुजांळ नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतल्याचे सुञांनी सांगितले. नितीन लोढा यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेने खळबळ उडाली असुन संबधीत व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला का केला याचे कारण माञ समजु शकले नाही अधीक तपास नेकनुर पोलीस करत आहेत.

""चौसाळा शहरात अवैध धंदे वाढले""
चौसाळा शहरात अवैध धंदे वाढले.

 असुन राञी दोन वाजेपंर्यत धाबे चालु असतात मधविक्रीची परवानगी नसताना देखील अनेक ढाबे चालक हे मधविक्री करताना पाहवायास मिळत आहेत तसेच शहरात गावठी दारूचे दुकानाचे देखील प्रमाण वाढले शहरात अवैध दारूविक्रीचे दुकान वीस पेक्षा जास्त आहेत यातुन शहरात गुन्हेगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे याकडे माञ नेकनुर पोलीस डोळे झाक करत असल्याचे चिञ दिसत आहे 
नेकनुर पोलीस स्टेशनला खमक्या अधीकारी मिळेल का अशी चर्चा सर्वसामान्य जनता करताना पाहावायास मिळत आहे.

No comments:

Post a Comment