*बीड जिल्हयातील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेचे वास्तव पंकजा मुंडे यांनी मांडले, यात चुकीचे काय होते? हा प्रश्न केवळ पंकजाच उपस्थित केला नाही तर सर्व जनता आणि माध्यमांनी देखील भयावह परिस्थिती निर्माण झाल्याचे म्हटले आहे.
बीड । बीड जिल्हयाची सुरक्षा आणि भविष्याविषयीची चिंता हा पंकजा मुंडे यांचा धर्म आहे, यासाठीच त्यांनी हा मुद्दा उचलून धरला पण आज बीडची जी बदनामी होत आहे, ती केवळ तुमच्या नाकर्तेपणामुळे होत आहे असा सणसणीत टोला खा. डाॅ. प्रितम मुंडे यांनी लगावला आहे. बीड जिल्हयातील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेचे वास्तव पंकजा मुंडे यांनी मांडले, यात चुकीचे काय होते? हा प्रश्न केवळ पंकजाच उपस्थित केला नाही तर सर्व जनता आणि माध्यमांनी देखील भयावह परिस्थिती निर्माण झाल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही तर तुमच्याच पक्षाच्या आमदारांनी विधानसभेत या विषयावर आक्रमक लक्षवेधी मांडली, तरीही तुमचे डोळे उघडत नाहीत, जनतेला तुम्ही गृहीत धरत आहात का? असा सवाल खा. प्रितम मुंडे यांनी केला आहे. Also Read - पोलीस बदली प्रकरणी फडणवीसांचा जबाब नोंदविला; थोड्याच वेळात माध्यमांशी संवाद साधणार पंकजा मुंडे ७ तारखेला हाॅस्पीटलमध्ये अॅडमिट होत्या, त्यांची एक छोटीसी शस्त्रक्रिया झाली त्यांची प्रकृती खराब आहे. पंकजा पातळी सोडून राजकारण करता येत असते तर त्या खूप बोलल्या असत्या पण त्या तत्त्वाच्या राजकारणी आहेत. तुमचे आमदार लक्षवेधी आधी देतात, गावातील कार्यालयापासून ते तुमच्या कॅबिनपर्यंत माफिया राज आहे हे जगजाहीर आहे. जिल्हयातील गुन्हेगारीच्या ज्या काही घटना दिवसेंदिवस वाढत आहेत, ते तुमच्या कारभाराचे अपयश आहे, त्यावर चिंतन करायचे सोडून उलट पंकजा मुंडेवरच टिका करणे हे शोभते का? स्वतःच्या नाकर्तेपणाचे खापर दुसर्यावर फोडण्याची तुमची नेहमीचीच सवय आहे असे डाॅ. प्रितम मुंडे यांनी म्हटले आहे.
No comments:
Post a Comment