पुणे (प्रतिनिधी) आज 12 मार्च 2022 रोजी हॉटेल रेणुका एक्झिक्युटिव्ह म्हाळुंगे चाकण एमआयडीसी पुणे येथे #जिंदाल_ट्यूब तर्फे आयोजित प्लंबर्स मीटिंगला 50 प्लंबर्स उपस्थित होते माननीय केतन सर हे विशेष चेन्नईहून आले होते.
प्लंबरच्या स्थानिक समस्यांवर चर्चा करण्यात आली. तांत्रिक मुद्द्यांवर प्रश्नोत्तराचे सत्र घेण्यात आले व त्यामध्ये माननीय केतन सर यांनी महत्वाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय बचुटे यांनी केले. बैठकीच्याशेवटी प्लंबरसाठी आवश्यक भेटवस्तू देण्यात आल्या. डिनरची व्यवस्था करण्यात आली. प्रीतमजी गांधी यांनी सर्व प्लंबर्सचे आभार मानले. केतन सर म्हणाले की स्थानिक प्लंबर लोकांना त्यांचे स्वतःचे IPSC ची ओळखपत्रे दिली जातील. (इंडियन प्लंबिंग स्किल कौन्सिल)
जिंदाल ट्यूबचे पुणे जिल्हा विक्री अधिकारी अक्षय बचुटे, सेफ्रॉन एंटरप्राइजचे प्रीतमजी गांधी आणि राजेंद्रजी धाडे सर, आर्य एंटरप्रायझेसचे विशालजी गोरे यांनी प्लंबर मीटिंग यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment