Sunday, March 13, 2022

कांतीकारी साथी न्युज आजच रविवारचं राशीभविष्य: तीन राशींसांठी आहे मानसिक ताणाचा दिवस; जपून पावलं टाका.


मेष 

आज  चिंता कमी होईल. दशम शुक्र शनी लाभ मिळवून  देईल. तसेच कार्यक्षेत्रात संधी मिळवून देतील. तुमचे नाव सगळीकडे होईल. दिवस उत्तम.

वृषभ

आज  ग्रह काहीशी द्विधा मनस्थिती करतील..तरीही आता भाग्य साथ देत आहे. अडचणीतून मार्ग निघेल. चंद्र पराक्रम स्थानात उत्तम आहे. दिवस शुभ.

मिथुन

खर्च, अडचणी, मानसिक ताण असा हा दिवस आहे. कामात काही अडचणी येतील. आर्थिक लाभ घडतील. दिवस मध्यम.

कर्क

आज राशी स्थानातील चंद्र  जोडीदाराची काळजी  घ्या असे सुचवीत आहे. .मन थोडे अशांत राहील.  आर्थिक दृष्टया दिवस बरा जाईल.

सिंह

मंगळ शनि योग सध्या मानसिक, शारीरिक ताण देत आहे. जपून राहण्याचा काळ आहे. चंद्र आज खर्च  करील. दिवस चांगला आहे.

कन्या

मानसन्मान , समाजात नाव लौकिक असा सध्याचा काळ आहे. शुक्र घराचे नूतीकरणासाठी मदत करेल. भाग्य साथ देईल.  चंद्र  संततीची  चिंता देईल. दिवस चांगला आहे .

तुला

आज दिवस क्षणो क्षणी पाऊल जपून टाका असे सांगत आहे. घरातील दुखणी.खर्च  आता कमी होतील.. दशम चंद्र ऑफिसमध्ये भरपूर काम देईल. दिवस मध्यम.

वृश्चिक

भावंडांमध्ये मध्ये मतभेद,गैरसमज होऊ शकतात. व्यावसायिक संबंध सुद्धा तणावपूर्ण राहतील.  आर्थिक लाभ होऊ शकतात. संततीसाठी दिवस बरा.

धनु

शनि मंगळ स्वभाव उग्र करतील. चंद्र आर्थिक अडचणी  निवारण करेल. कुटुंब सुख  मिळेल. काम भरपूर करावे लागेल. दिवस मध्यम.

मकर

शनि, बुध, मंगळ सध्या राशीत आहेत. राशीसमोरील चंद्र  जोडीदाराची चिंता दूर करेल. स्वभाव  काहीसा उग्र होईल. शांत रहा. लवकरच बदल होईल. दिवस बरा.

कुंभ

आज घरामध्ये विचित्र ताण जाणवेल. काही जास्तीच्या जबाबदाऱ्या,पाहुणे सुद्धा येऊ शकतात.  चंद्र खर्च खूप करवेल. राशीतील गुरू बल देईल.दिवस चांगला आहे.

मीन

छोटे मोठे प्रवास, नातेवाईकांशी संपर्क असा हा दिवस आनंदात पार पडेल.गुरू धार्मिक कारणांसाठी काही खर्च करेल. संततीला वेळ द्याल. दिवस उत्तम.

शुभम भवतु !!

No comments:

Post a Comment