पुणे : (प्रतिनीधी) कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तर पुण्यात त्याहीपेक्षा कडक नियमावली लागू करण्यात आली आहे. त्यानुसार, सर्व दुकाने बंद आहेत. त्यानंतर आता या निर्णयावरून पुणे व्यापारी महासंघ आक्रमक झाला असून, दोन दिवसीय तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे सांगितले.
यात गुरुवारी (ता. 8) विजय टॉकीज ते क्वार्टर गेटपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा व्यापारी सदस्य निषेधाचा फलकासोबत दंडावर काळी फित लावून निषेध नोंदविणार आहे. तसेच आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणजे शुक्रवारी (ता. 9) सकाळी साडेआठ वाजता दुकाने उघडतील आणि सायंकाळी 6 वाजता बंद होतील’. दरम्यान, पुण्यातील दुकाने शुक्रवारी उघडणार असल्याने पोलिस किंवा प्रशासकीय अधिकारी यांना जी कारवाई करायची आहे, ती त्यांनी करावी अशा शब्दात रांका यांनी खुले आव्हान दिले आहे. मात्र, या कारवाईवेळी व्यापारी वर्ग एकत्रित होऊन संबंधित व्यापाऱ्याच्या पाठीशी उभा राहील असेही ते म्हणाले.

No comments:
Post a Comment