Friday, April 23, 2021

महाराष्ट्रसाठी आनंदाची बातमी ! ऑक्सिजन एक्सप्रेस विशाखापट्टणमहून महाराष्ट्राकडे रवाना.


विशाखापट्टणम : वृत्त संस्था – महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या देशात सर्वाधिक आहे. राज्यात ऑक्सिजन आणि रेमडेसिविरचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी विशाखापट्टणम येथील स्टील प्रकल्पातून रेल्वेद्वारे ऑक्सिजन पुरवठा करण्यात येत आहे. शुक्रवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास ही ऑक्सिजन एक्सप्रेस विशाखापट्टणममधून निघाली आहे.

मुंबईतील कळबोळी येथून विशाखापट्टणम येथे ७ ऑक्सिजन टँकर घेऊन एक्सप्रेस काल पोहचली होती. तिला तेथे पोहचायला ५२ तास लागले. तेथे ऑक्सिजन भरल्यानंतर मध्यरात्री ही एक्सप्रेस महाराष्ट्राकडे रवाना झाली आहे. ही एक्सप्रेस उद्या दुपारी ३ वाजेपर्यंत नागपूरला दाखल होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर ती शनिवारी मुंबईत पोहचण्याची शक्यता आहे. त्यानंतरच महाराष्ट्रातील ऑक्सिजनचा तुटवडा काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment