बीड (प्रतिनिधी) दि.09 गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊन, संचारबंदी, निर्बंध लावणे सुरु आहे. कोरोनाच्या अनुषंगाने उपाययोजना म्हणून सुरुवातीला व्यापारी, छोटेमोठे व्यावसायिक, शेतकऱ्यांनी, लॉकडाऊन, संचारबंदीचे स्वयंस्फूर्तीने पालन केले, मात्र आता वर्ष उलटले तरी कोरोनाची स्थिती जशीच्या तशी आहे. व्यापारी, छोटेमोठे व्यावसायिक नियमाचे पालन करत आहेत, शासनाने सांगितले तेव्हा अँटीजेन टेस्ट करत आहेत. मात्र आता कडक निर्बंध व लॉकडाऊन हा व्यापारी, छोटेमोठे व्यावसायिक, हातावर पोट असणाऱ्या मोलमजुरी, शेतकरी, असंघटित कामगार यांना उपाशी मारण्याचे काम करत आहे.
यापूर्वी आपण दि २६ मार्च २०२१ ते ४ एप्रिल २०२१ पर्यंत लॉकडाऊन लावलेला होता, त्यानंतर लगेचच दि ६ एप्रिल २०२१ ते ३० एप्रिल २०२१ पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन केलेला आहे. हा लॉकडाऊन अन्यायकारक आहे.रोजीरोटी, दैनंदिन गरजा, व्यावसायिक गाळे, आस्थापना यांची भाडे, लाईटबील, इंटरनेट बिल, कर्जाचे हप्ते हे देखील आता पूर्ण केले जाऊ शकत नाही. शासनाने सर्व व्यवहार कोरोना उपाययोजनांच्या नावाखाली बंद केले आहेत मात्र मदत दिलेली नाही. यामुळे सर्वांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झालेली आहे.
''लॉकडाऊन विरोधी संघर्ष समिती'' आपणाकडे याच छोटेमोठे व्यापारी-व्यावसायिक, शेतकरी, भाजीपाला विक्रेते, हातगाडी विक्रेते, असंघटित कामगार, क्रीडा - शैक्षणिक क्लासेस, विविध सेवादार, लघुउद्योजक, शेतीपूरक व्यावसायिक, हातावर पोट असणाऱ्यांच्या वतीने आपणाकडे पुढील मागणी एकमताने करण्यात येत आहे. "'सर्व आस्थापने, लहान - मोठे व्यवसाय, दुकाने, सेवा, हातगाडी व्यवसाय, मंगल कार्यालये(५०% क्षमतेने), खाजगी क्लासेस हे सकाळी १० ते सायंकाळी ०७ वाजेपर्यंत दररोज उघडण्यास परवानगी देण्यात यावी" आम्ही सर्व नियम व अटी यांचे काटेकोरपणे पालन करण्यास तयार आहोत. आपण या मागणीचा विचार करून लॉकडाऊन वरील वेळेप्रमाणे शिथिल करावा अन्यथा बीड जिल्ह्यातील सर्व व्यापारी आपली दुकाने, आस्थापने मंगळवार दि. १३ एप्रिल २०२१ पासून उघडून या राज्य सरकारच्या निर्बंधांविरोधात असहकार आंदोलन सुरु करण्यात येईल.
जिल्हाधिकारी बीड यांना लेखी स्वरूपात दिलेल्या निवेदनात मागणी करण्यात आले आहे. त्यामध्ये अशोक हिंगे
मराठवाडा अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी ऍड. शफिक भाऊ शेख
जिल्हाध्यक्ष एमआयएम, बीड
अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी, बीड भास्कर गायकवाड जिल्हाउपाध्यक्ष, व्यापारी महासंघ धनंजय गुंदेकर
युवा उद्योजक संघ मौलाना जाकेर प्रदेश उपाध्यक्ष, जमियत उलेमा मुफ्ती अब्दुल्ला
जिल्हाध्यक्ष, जमियत उलेमा उदय जोगदंड रेडिमेड कपडा असो.
अमोल भांडेकर
रेडिमेड कपडा असो.हेमंत बेदरे
सराफ असो. दीपक जोजारे
सराफ असो गौतम नाना बिडवे
नाभिक संघटना दिलीप वखरे
नाभिक संघटना फय्याज कुरेशी
कारंजा-बलभीम चौक व्या. असो
संतोष गोरे मंडप डेको असो
ज्ञानेश्वर जवकरभांडी असो रुपेश संघानी बॅग असो संदीप शेटे कटलरी असो शंकर सुरवसे
सिद्धिविनायक कॉम्प, असो
चंदन दातवानीकपडा असो
मंगेश लोळगे सराफ असो
धम्मानंद वाघमारे जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना, दत्ता प्रभाळे शेकाप, बीड रामधन जमाले
टेलर असो डॉ.नितीन सोनवणे, बबन वडमारे संतोष जोगदंड, पुष्पाताई तुरुकमाने
वंचित बहुजन आघाडीसंतोष जोगदंडजिल्हाउपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी. आदी व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment