औरंगाबाद- (कांतीकारी साथी न्युज ) डाॕ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बी.ए, बीएस्सी व बीकॉमसह अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षा २ मे पर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. तसेच इतर अभ्यासक्रमाची परीक्षाही २७ एप्रिलऐवजी ५ मे पासून सुरू होणार आहे.
.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील बी.ए, बीएस्सी व बीकॉम प्रथम वर्षाची परीक्षा ७ एप्रिलपासून सुरळीतपणे सुरु झाली होती. तर परंपरागत पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय व तृतीय वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा १६ मार्चपासून व ६ एप्रिलपासून अभियांत्रिकीसह सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरु होत्या.
त्यामुळे १५ ते ३० एप्रिल होणारे सर्व अभ्यासक्रमांचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. आता ३ मे पासून उर्वरित पेपर घेण्यात येणार आहेत. तर पदवी तर अभ्यासक्रमाची २७ एप्रिल पासून होणारी परीक्षा आता ५ मे पासून सुरू होणार आहे.
No comments:
Post a Comment