* गजा मारणे आणि त्याच्या साथिदारांवर खंडणी आणि चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : (प्रतिनीधी) निर्दोष सुटल्यानंतर मिरवणूक काढणे कुख्यात गुंड गजा मारणे याला महागात पडले आहे. गजा मारणे आणि त्याच्या साथिदारांवर खंडणी आणि चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी शिरगाव चौकी आणि तळेगाव पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल केले आहेत. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर टोल न भरणे तसेच, त्यापूर्वीच्या फूड मॉलवर जबरदस्तीने वस्तू घेतल्याचा ठपका गजा मारणेवर ठेवण्यात आला आहे. तसेच गजा मारणे याच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारावाई केली जाईल असेही पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी सांगितलं.
गुन्हा नेमका का?
पप्पू गावडे आणि अमोल बधे खून खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गजा मारणेच्या साथीदारांनी त्याची तळोजा कारागृहाबाहेरुन मिरवणूक काढली होती. गजा मारणे हा त्याच्या साथीदारांसह द्रुतगती महामार्गावरुन पुण्याच्या दिशेने येत होता. या मिरवणुकीत जवळपास 300 गाड्या होत्या. त्यावेळी त्याच्या साथीदारांनी उर्से टोल नाका येथे थांबून फटाके वाजवून आरडा-ओरडा केला होता. या सर्वाचे ड्रोन कॅमराने चित्रीकरण करून दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. तसेच उर्से टोल नाक्यावर गजा भरणे यांने टोल न भरणे तसेच आधीच्या दुकानातून जबरदस्तीने सामान घेतल्याचे काम त्याच्या साथीदाराने केले होते. तसा आरोप गाजा मारणा आणि त्याच्या साथिदारांवर ठेवण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment