Saturday, April 24, 2021

अजून किती माणसं मेल्यावर रेमडिसिव्हर इंजेक्शन उपलब्ध करणार आहेत : राजेश शिंदे


* खासगी डॉक्टरांनी आवश्यकता असेल तरच इंजेक्शन द्याव
पालकमंत्री,जिल्हाधिकारी साहेब परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्या.

बीड (प्रतिनिधी)दि.24 कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भाव मुळे बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस पेशंट वाढत आहेत आणि अश्या गंभीर परस्थिती मध्ये मात्र या रोगावर शेवटचा पर्याय म्हणून उपयुक्त असणारे रेमडिसिव्हर इंजेक्शन चा तुटवाडा पडलेला आहे या मुळे रुग्णाच्या नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात होळसांड होत आहे. व इंजेक्शन न मिळाल्यामुळे अनेकांचे जीव गेलेले आहेत म्हणून अजून किती निष्पाप लोकांचे जीव गेल्यावर प्रशासन रेमडिसिव्हर इंजेक्शन उपलब्ध करणार आहे असा सवाल सामाजिक कार्यकर्ते तथा संविधान युवा मंचाचे अध्यक्ष राजेश शिंदे यांनी केली आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस पेशंट वाढत आहेत आणि अश्या गंभीर परस्थिती मध्ये मात्र या रोगावर उपयुक्त असणारे रेमडिसिव्हर इंजेक्शन चा तुटवाडा पडलेला आहे. प्रायव्हेट दवाखान्यामधील रुग्णांना रेमडिसिव्हर इंजेक्शन मिळत नसल्यामुळे रुग्णाचे नातेवाईक मोठ्या अडचणींचा सामना करत आहेत. रेमडिसिव्हर इंजेक्शन हे शेवटचा पर्याय म्हणून वापरात येणारे इंजेक्शन असून हे इंजेक्शन खासगी डॉक्टर आवश्यक नसताना ही देत आहे या मुळे रुग्णांना भविष्यात मोठ्या प्रमाणात वेगवेगळे आजार होण्याची दाट शक्यता आहे या वरही निर्बंध आले पाहिजेत आवश्यकता असेल तरच गे इंजेक्शन दिले पाहिजे.
मोठ्या प्रमाणात रेमडिसिव्हर इंजेक्शन चा काळा बाजार सुरू असून 800 ते 1400 रुपये किमतीचे हे इंजेक्शन आज 20000 ते 30000 हजार रुपयांना विकल जात आहे. हा सामान्य लोकांना लुटण्याचा सर्रास धंदा सुरू आहे अश्या ब्लॅक ने इंजेक्शन विकणाऱ्या खासगी मेडिकल दवाखाण्यावर प्रशासनाने कार्यवाही करणे गरजेचे आहे. 
बीड शहरातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असताना इंजेक्शन चा तुटवडा पडत आहे. अश्या परिस्थिती मध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शन उपलब्ध कुठून करावं हा प्रश्न पडत आहे आणि या मुळे त्यांची मोठ्या प्रमाणात होळसांड होत असून मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
वेळेत इंजेक्शन न भेटल्यामुळे अनेकांचे जीव गेलेले आहेत अश्या गंभीर परिस्थिती मध्ये बीड जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी साहेबांनी परिस्थिती चे गांभीर्य ओळखून मुबलक प्रमाणात रेमडिसिव्हर इंजेक्शन चा साठा उपलब्ध करून मागेल त्याला इंजेक्शन देण्यात यावे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेश शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रका द्वारे केली आहे...

No comments:

Post a Comment