बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम संस्थानचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांचा जन्म केज तालुक्यातील गोटेगाव या गावात शेतकरी कुटुंबात झाला. ज्याप्रमाणे प्रत्येक आई-वडिलांना वाटत कि ,आपल्या लेकराने खूप शिकाव आणि मोठा होवून धंदा,शेती किंवा नौकरी करावी आणि लग्न करून संसारात रमावे ; अगदी असच महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या आई-वडिलांना वाटायचं, परंतु लहान महादेवाच्या मनात फक्त देवाचीच ओढ होती. यामध्ये संसार , स्वार्थ, मोह आणि माया याला जागा नव्हती. अस म्हणतात कि,जे पेराल तेच उगवत. महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या घरात पूर्वी पासूनच पंढरीची वारी होती. लहान वयातच त्यांना पंढरीच्या पांडूरंगाची वोढ लागली . शिक्षणाबरोबरच त्यांचे मन किर्तन आणि भजनात रमू लागले . अगदी गावातील आणि पंचक्रोशीतल होणार्या सप्ताहातील कीर्तनात ते रमून जायचे.बर्याच वेळेला ते गोटेगावातील बालसंवंगडी गोळा करून किर्तन करत. गोटेगाव पासून हाकेच्या अंतरावर माळेगाव हे महाराजांचे आजोळ. आजोळची माणसं मायाळू आणि प्रेम करणारी. आजही या वयात आजोळच्या लोकांनी त्यांना अंतर दिले नाही. ऐवढा सगळा मायेचा पसारा बाजूला सारून त्यांनी देवाची आळंदी गाठली. श्री क्षेत्र आळंदी येथे राहून आध्यात्मिक शिक्षणास सुरूवात केली. संत आणि संत साहित्याच्या अभ्यासात स्वतःला झोकून दिले. आणि पाहता पाहता विठोबाच्या भक्ताने काशी विद्यापिठाची 'शास्त्री ' हि पदवी मिळवली. आभ्यासाने ,चिंतनाने आणि किर्तनाच्या देव आणि देवमाणसांच्या अधिक जवळ जाता आले. आयुष्य कोणाचे आणि कोणासाठी हे समजल्याने आजन्म ब्रह्मचारी राहण्याचा निर्णय घेतला. ब्रह्मचारी व्यक्तीला शोभेल असाच आदर्श जीवनप्रवास महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री करत आहेत. दैनंदिन जीवनात ते संसार जगतापासून तटस्थ, निस्वार्थ आणि संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील विचारांनी समाज जागृत करण्याचे काम ते करत आहेत. ब्रह्मचारी जीवन जगणे आणि विठोबा,ज्ञानोबा-तूकोबाच्या नामाचा जप करणे हेच आयुष्य झाले. पुढे कित्येक दिवस किर्तन,भजन आणि विठोबाची वारी सुरू असतानाच त्यांच्या मनाला वाटले कि, आपण संत तुकाराम महाराजांचे मंदिर उभारावे. अस म्हणतात कि, जसे विचार आपल्या मनात येतात त्यानुसार आचरण घडते. किर्तनाच्या माध्यमातून महाराजांचे अनेक भक्त महाराष्ट्रभर तयार झाले. केज तालुक्यातील औरंगपूर येथील माळरानावरील अंबाजोगाई-कळंब मुख्य रस्त्यालगत संत तुकाराम महाराजांचे भव्य मंदिर उभे केले. संत तुकोबाराय पावनधाम येथील विठोबा- तुकोबाचे नेत्रदीपक मंदिर येणार्या-जाणार्या भाविकांचे लक्ष वेधुन घेत आहे.महंत ह.भ.प.बोराडे महाराजांच्या प्रयत्नातून आणि लोकसहभागातून जगदगुरू तुकोबाराय यांचे मंदिर हे माळकरी,शेतकरी,निराधार आणि विठोबा-तुकोबावर भक्ती असणार्या लाखो भक्तांचे ' माहेर ' झाले आहे. श्री क्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम संस्थानचे संस्थापक अध्यक्ष महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांनी मंदिर उभारणी पासूनच सर्वांना समान वागणूक दिली आहे. गरीब-श्रीमंत असा भेद न करता पावनधाम येथे दर्शनाला येणारे सर्वच पांडूरंगाची लेकर आहेत. असच ते मानतात. श्री क्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम संस्थानच्या माध्यमातून अनेक अनाथ मूलांचा सांभाळ करून अनाथांचे नाथ झालेले बोराडे महाराज हे खर्या अर्थाने माणसातील देवच आहेत. पावनधाम येथे येणार्या लहान-थोर भक्तांना
डोळसपणे मार्गदर्शन करण्याचे काम महादेव महाराज बोराडे करत आहेत.पावनधाम संस्थानच्या माध्यमातून माळकरी, शेतकरी,युवक,वारकरी यांना केंद्रभूत मानून त्यांना संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील विचार सांगून योग्य दिशा देण्याचे काम मागच्या अनेक वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे.
त्याचबरोबर महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी नित्यनेमाने गुरूपौर्णिमा, दसरा मेळावा, दिवाळीतील दिव्यांचा दिपोत्सव आणि संत तुकाराम महाराजांचा बीजोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. केज तालुक्यातील गोटेगाव या जन्मभूमी पासून महादेव महाराज बोराडे यांचे सुरू झालेलं आयुष्य आज औरंगपूर येथील माळरानावर प्रतिदेहू उभाकरून स्थिरावल आहे.
------+++++-------
संतोष विठ्ठलराव रोकडे // पत्रकार
9921173391
No comments:
Post a Comment