बीड (प्रतिनीधी )ः- राज्य सरकारचे ऑनलाईन बदल्यांचे धोरण असतांना यावर्षी सत्तेवर आलेल्या सेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरकारने या धोरणाला हरताळ फासत ऑफलाईन जिल्हा परिषद कर्मचार्यांच्या बदल्याचा निर्णय घेतला.
प्रत्येक वर्षी मे मध्ये होणार्या बद्ल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज पासून सुरू होत असून जिल्हा परिषदेच्या एकूण दहा विभागाअंतर्गत होणार्या बद्लयातून आज पाच विभागाच्या बद्ल्या होणार आहे. यामध्ये दहाटक्के प्रशासकीय आणि पाच टक्के विनंती बदल्या होणार आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या सभागृहामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांच्या उपस्थितीमध्ये या बदल्या पार पडत आहे. यामध्ये प्रत्येक विभागाच्या दहाटक्के बदली पात्र कर्मचार्यांची यादी गेल्या एक महिन्यापूर्वीच संबंधीतविभागाने बनवलेली आहे. प्रशासकीय पात्रतेनूसार आणि विनंती नुसार आलेल्याबदली पात्र कर्मचार्याची यादी सामान्य प्रशासनाने सुचना फलकावर लावून त्याच्यावर आक्षेप नोंदवल्यानंतर ही परीपुर्ण यादी विभागाने बनवली आहे.त्यानूसार आज बदली पात्र सर्व कर्मचारी आणि त्या विभागाचे खाते प्रमुखयांना कांउन्सलींग द्वारे याबद्लया करण्यात येणार आहे. राज्य सरकारने
ऑफलाईन बदल्या करण्याच्या निर्णय घेतल्याने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष,
उपाध्यक्ष, सभापती आणि जिल्हा परिषद सदस्य हे जामं खुश झाले होते. मात्र
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्यांची डाळ
न शिजू दिल्यामुळे यांचा हिरेमुड झाला आहे. सबंधीत खाते प्रमुखांकडून
अद्यावयात यादी बनवूनच या बदल्या होत असल्यामुळे कर्मचार्यांनीही समाधान व्यक्त केले आहे. मात्र जे कर्मचारी राजकीय पुढार्यांच्या आश्रयानेनोकरी करतात त्यांचे मात्र डाळ शिजलेली नाही. उद्या सर्वात मोठ्या शिक्षकांच्या बदल्या आहे.
No comments:
Post a Comment