Monday, August 3, 2020

शेतमजुरी करणाऱ्या महिलाच्या अंगावर वीज पडून महिला गंभीर जखमी.


बीड (प्रतिनीधी )- वडवणी तालुक्यातील चिंचवटी येथे चार महिला मजुरीसाठी शेतात गेल्या असता त्यांच्या अंगावर वीज पडल्याने त्या जखमी झाल्या. यामध्णये सत्यभामा अंकुश गेंडे (वय ६०) ह्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर शहरातील खासगी हॉपिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी दुपारी ४ वाजता घडली मात्र अद्यापही या घटनेचा पंचनामा करण्यात आलेला नाही.
   वडवणी तालुक्यातील चिंचोटी येथील चार महिला शनिवारी शेतात मजुरीसाठी गेल्या असता दुपारी चार वाजता वादळी वार्‍यासह पाऊस झाला. या वेळी चारही महिला एका झाडाखाली बसल्या असता त्यांच्या अंगावर वीज पडली. यामध्ये सत्यभामा अंकुश गेंडे ह्या गंभीर जखमी झाल्या तर इतर तिन महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत. सत्यभामा गेंडे यांच्यावर शहरातील दीप हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्या अत्यवस्थ आहेत. अद्यापही तलाठी यांनी पंचनामा केला नाही. 
 

No comments:

Post a Comment