Saturday, August 1, 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बकरी ईदनिमित्त जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त .

* 167 अधिकारी 2298 पोलीसांसह 500 होमगार्ड बंदोबस्तावर.

बीड : आज देशभरात साजर्‍या होत असलेल्या बकरी ईदनिमित्त बीड पोलीस दलाने जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. यावर्षी कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता बकरी ईदचा नमाज मस्जिद अथवा इदगाह या ठिकाणी अदा न करता नागरिकांनी आपआपल्या घरीच अदा करावा. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये, तसेच सर्व नागरिकांनी कोरोनाच्या अनुषंगाने प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी केले आहे.
जिल्ह्यातील 28 ठाणे हद्दीतील बंदोबस्तासाठी 2 अप्पर अधीक्षक, 5 उपअधीक्षक, 22 निरीक्षक, 61 सहाय्यक निरीक्षक, 75 उपनिरीक्षक, 2219 कर्मचारी व 500 होमगार्ड असे एकुण जिल्ह्यात 167 अधिकारी, 2298 कर्मचारी आणि 500 होमगार्ड यांचा बंदोबस्त ठेवला जाणार आहे.जिल्ह्यात एकुण 30 ठिकाणी नाकाबंदी करण्यात येवून 18 ठिकाणी कोबींग ऑपरेशन घेण्यात आले आहेत. आणखी 10 ठिकाणी कोबींग ऑपरेशन घेण्याचे नियोजन पोलीसांनी केले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात ठाणे प्रभारींकडून शांतता कमिटी व मोहल्ला एकता कमिटी सदस्यांच्या एकुण 30 बैठका घेण्यात आल्या आहेत. बकरी ईदच्या काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याची खबरदारी घ्यावी अशा सूचनाही पोलीस अधीक्षकांना पोलीस यंत्रणेला दिल्या आहेत. 
बकरी ईदनिमित्त जिल्ह्यात राज्य राखीव पोलीस बलाची 1 कंपनी 3 प्लाटूनमध्ये विभागून 3 ठिकाणी तैनात राहिल. यात 2 अधिकारी व 79 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय 4 आरसीपी तुकड्या 4 विविध ठिकाणी बंदोबस्ताला असणार आहेत.

*अफवा पसरवणार्‍यांवर करडी नजर*

जिल्ह्यात खोट्या बातम्या व अफवांचे तात्काळ खंडण करण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क आहे. अफवा पसवरणार्‍यांवर बीड पोलीसांचा सोशल मीडिया सेल 24 तास करडी नजर ठेवून आहे. तसेच बीडसह सर्व मुख्य शहरे सीसीटिव्हीच्या निगराणीखाली आहेत. जिल्ह्यातील संवेदनशील गावे व ठिकाणांना वेळोवेळी भेटी देवून सर्व ठाणे स्तराव दंगाकाबू पथकाच्या रंगीत तालमी घेण्यात येत आहेत.

No comments:

Post a Comment