केज (प्रतिनिधी) लातूर - मांजरसुंभा या रस्त्याची संपूर्ण कामे झालेली नसतानाच केज शहरापासून जवळच असलेल्या टोल नाक्यावर मागच्या काही महिन्यांपासून वसुली जोरात सुरू झालेली आहे. ही वसुली जोरदारपणे सुरू असताना देखील या रस्त्याच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या नावाने मात्र बोंबाबोंब सुरू आहे. केज शहर आणि तालुक्यातील अनेक ठिकाणी या रस्त्याच्या समस्या वाहनधारकांना सतावत आहेत.
केज शहरात अनेक ठिकाणी या रस्त्याची कामे अर्धवट असताना तसेच ग्रामीण भागातील देखील अनेक ठिकाणी समस्या असताना घाईघाईने उमरी कारखान्याजवळ टोल नाका सुरू करुन वसुली मोठ्या प्रमाणावर सुरू केली आहे. मग वसुली सुरू असताना देखील या रस्त्याच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी का लक्ष दिले जात नाही असा सवाल पादचारी आणि वाहनचालकांना आहे. जर या रस्त्याची देखभाल आणि दुरुस्ती करायची नसेल तर वसुली बंद करा म्हणून आंदोलन उभं राहू शकतं याचीही नोंद टोलनाका वसुली प्रशासनाने घेणं आता आवश्यक झाले आहे.
No comments:
Post a Comment