Friday, May 8, 2026

भूसंपादन घोटाळ्यात तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना 15 मे पर्यंत पोलीस कोठडी बीड न्यायालयाचा आदेश.

बीड (प्रतिनिधी): बीड-धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनातील वाढीव मोबदल्याच्या तब्बल २४१ कोटी ६२ लाख रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले तत्कालीन जिल्हाधिकारी तथा आयएएस अधिकारी अविनाश पाठक यांना बीड न्यायालयाने १५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता हा आदेशभूसंपादनाच्या १५४ प्रकरणांमध्ये वाढीव मोबदल्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप असून, या प्रकरणी यापूर्वीच दहा जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान समोर आलेल्या कागदपत्रांतील स्वाक्षऱ्या, मंजुरी आदेश आणि आर्थिक व्यवहारांच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा बदलत अविनाश पाठक यांच्यापर्यंत धागेदोरे पोहोचवले.

कागदपत्रांवरील स्वाक्षरींच्या अहवालानंतर पोलिसांनी पाठक यांना लातूर येथून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. प्राथमिक चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. तपासासाठी अधिक वेळ आवश्यक असल्याचे सांगत पोलिसांनी न्यायालयाकडे पोलीस कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने ती मान्य करत १५ मेपर्यंत कोठडी सुनावली.

दरम्यान, या घोटाळ्यात आणखी काही अधिकारी, कर्मचारी व मध्यस्थांची नावे पुढे येण्याची शक्यता व्यक्त होत असून, आर्थिक व्यवहारांची साखळी आणि बनावट कागदपत्रांची तपासणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्याला अटक होण्याची अलिकडच्या काळातील ही दुर्मिळ घटना मानली जात असून, संपूर्ण राज्यात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.

No comments:

Post a Comment