बीड- परळी महामार्गावरील जरूर फाटा येथे रास्ता रोको करण्यात आला आहे. यावेळी दुधाला ५० रुपये हमीभाव मिळावा, यासह अन्य मागण्यासाठी बीडच्या जरूर फाटा येथे शेतकरी नेते सुधीर काकडे यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आला. यावेळी शेकडो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी रस्त्यावर दूध रस्त्यावर ओतून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
या आहेत मागण्या.
पशु खाद्याच्या किमंती ५० टक्केपेक्षा कमी कराव्यात. पशु औषधे जीएसटीतुन मुक्त करावे. प्रत्येक गावात आद्यावत पशु वैद्यकीय प्रयोगाशाळा व पशु वैद्यकीय दावाखाना आसावा. शेतकरी हिस्त्र प्राण्याच्या दहशतीमुळे रात्री शेतात जाऊन शेतीला पाणी देऊ शकत नाही, त्यामुळे लाईट ही दिवसाची करावी. बीड तालुक्यातील बहुतांश गावात पाणी व चाऱ्याची समस्या निमार्ण झाली आहे. तरी दावणीला चारा व पाणी देण्यासाठी निर्णय घ्यावा.
No comments:
Post a Comment