*परळीतील अर्थव्यवस्था टिकवण्यासाठी परळीकर एकवटले.ठेवीदारांची पै अन पै सुरक्षित आहे : प्रा. गंगाधर शेळके.
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथील राजस्थानी मल्टिस्टेटसह इतरही लहान मोठ्या पतसंस्थेबाबत अफवा पसरवून शहरात आर्थिक आणीबाणीसदृश्य परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शहराच्या बाजारपेठेसह जनसामन्यांसाठी ही धोक्याची घंटा ओळखून शहरातील व्यापारी वर्गासह इतर क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने एकवटले.
त्यासाठी सोमवार दि. ४ डिसेंबर रोजी कठीण परिस्थिती आम्ही तुमच्या बरोबर आहोत हा संदेश देण्यासाठी राजस्थानी मल्टिस्टेट व शहरातील इतर आर्थिक संस्था व ग्राहक हितैशी मंडळींनी राणी लक्ष्मीबाई टॉवर पासून परळी वैजनाथ शहरात विश्वास पदयात्रा (रॅली) काढली.
राजस्थानी मल्टिस्टेटच्या ठेवीदारांना विश्वास देण्यासाठी शहरातील मान्यवर मंडळी मनोगत व्यक्त करत, नवीन ठेवी ठेवण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला.
याचे यश म्हणजे आज एकाच दिवसात प्राप्त माहितीनुसार राजस्थानी मल्टिस्टेटमध्ये तब्बल ३० लाख ४२ हजार रुपयांच्या नवीन ठेवी आणि ४० लाख रुपयांच्या ठेवींचे नूतनीकरण परळीकरांनी केले.
याप्रसंगी ठेवीदारांच्या हिताचा विचार करत आर्थिक संस्थांच्या संचालकांनी त्यांना विश्वासात घेऊन सत्य परिस्थिती अवगत करून द्यावी. तसेच भविष्यात कशा पद्धतीने ठेवीदारांचे हीत जोपासण्यासाठी करत असलेल्या उपाययोजना व आर्थिक नियोजन संचालकांनी जाहीरपणे सांगावे असे आवाहन उपस्थितांनी केले.
*ठेवीदारांची पै अन पै सुरक्षित आहे : प्रा. गंगाधर शेळके*
याप्रसंगी जागृती मल्टिस्टेट व पतसंस्थेचे अध्यक्ष प्रा. गंगाधर शेळके सरांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की ठेवीदारांची पै अन पै सुरक्षित आहे. ठेवीदारांच्या भावना आम्ही समजू शकतो पण कोणत्याही फुटकळ अफवेवर विश्वास ठेऊ नये आम्ही सदैव तुमचे हित जपू असा विश्वास व्यक्त केला.
No comments:
Post a Comment