Wednesday, December 6, 2023

घरात कोणी नसल्याचा फायदा घेत भर दिवसा चोरी. पावणे तीन लाखांचा ऐवज लंपास.


नेकनूर (प्रतिनिधी) - जवळच असलेल्या मुळूकवाडी मधील कवली वस्तीवर भरदिवसा चोरीची घटना घडली. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी पावणेतीन लाखाचा ऐवज लंपास केला.

मुळूकवाडीतील कवली वस्ती वर घरात कोणी नसल्याचे पाहून दिवसा दुपारी ४ ते ६ च्या दरम्यान चोरीची घटना घडली. चोरट्यांनी कपाटातील रोख २५ हजार रुपये आणि ४ तोळ्याचे मंगळसुत्र असा एकुण पावणे ३ लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवल्याचे घरमालक मुरलीधर दिनानाथ ढास वय ८३ व सौ.कौशल्याबाई मुरलीधर ढास यांनी सांगितले.दोघेही आज दुपारी ३ वाजता बेनसुर येथे धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते.सायंकाळी साडे सहा वाजता घरी आले असता पत्र्याच्या घराच्या दोन्ही खोल्यांचे कुलुप तुटल्याचे दिसुन आले.घरात कपाटातील कपडे अस्ताव्यस्त पडलेले दिसुन आले. याप्रकरणी माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

No comments:

Post a Comment