Tuesday, December 19, 2023

बजरंगबली वेताळ मंदिरात दत्त जन्मोत्सवाचे आयोजन.भाविकांनी धार्मिक कार्यक्रमास उपस्थित राहावे-प.पू.श्री विलासानंदजी महाराज.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) बजरंगबली वेताळ मंदिर येथे सोमवार दि.25 डिसेंबर 2023 रोजी श्री दत्त जन्मोत्सव सोहळयाचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक प.पू.श्री विलासानंदजी महाराज यांनी केले आहे.
शहरातील ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर परिसरात असलेल्या श्री बजरंगबली वेताळ मंदिरात श्री दत्त जन्मोत्सवानिमित्त  दि.25 डिसेंबर रोजी प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी विविध धार्मीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि.18 डिसेंबरपासून श्री दत्त पारायणास उत्साहात सुरुवात झाली असून 25 डिसेंबर रोजी दुपारी 12 वा. महाआरती होणार असून यानंतर दुपारी 1 ते 5 वा. महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. 
या सर्व धार्मीक कार्यक्रमास परळी शहर व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री बजरंगबली वेताळ मंदिर च्य वतीने संयोजक प.पू.श्री विलासानंदजी महाराज यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment