
भक्ती महिमा विशद करत राम नामाचे महत्व सांगितले.श्रीराम कथा निरूपणकार रविंद्र पाठक यांनी धार्मिक समरसता या विषयावर निरूपण केले.संसारात राम नाही असे असतानाही रामाकडे वळलात की संसार तुमची निंदा करतो.रामाकडे जाण्यासाठी आपण सर्वांनी जीवनाची दिशा बदलली पाहिजे.आपल्या जीवनात देवप्रियत्व आले की जनप्रियत्व मागे येते.श्रीरामाची भक्ती केल्यानेच हनुमंत,बिभीषन हे प्रभुरामात समरस झाले आणि त्यांना चिरंजीव पद प्राप्त झाले.

संगीतमय कथेत निरूपणकार यांना गायनासाठी निशाद व्यास,माधव लिमये हार्मोनियम,अनिकेत घिवलिकर - सतार वादक,धवल जोशी - बासरी,सोहम जोशी - तबला,मिलिंद इनामदार - टाळ तर विश्वनाथ झावरे - पखवाज वादन करत साथ देत आहेत.संगीतमय कथा श्रवणासाठी परिसरातील भाविकांसह श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज शिष्यपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होत आहे.तसेच श्रीरामचरित मानस कथेवर आधारित संगीतमय श्रीराम कथा श्रवणासाठी विविध राज्यातील संत महंत,साधूंची उपस्थिती लाभत आहे.
No comments:
Post a Comment